Goa Covid-19  Dainik Gomantak
गोवा

Goa Covid-19: पुन्हा बळींचे सत्र सुरू; काल 6 जणांचा मृत्यू

Covid-19 Goa: सध्या तरी कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय गोव्याकडे आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोरोनामुळे (Covid-19 Goa) राज्यात रविवारी 6 जणांचा मृत्यू झाला. शनिवारी एकाचेही निधन झाले नव्हते. त्यानंतर आज पुन्हा बळींचे सत्र सुरू झाले. ज्या सहा जणांचा मृत्यू झाला त्यातील 5 जण गोमेकॉ इस्पितळात तर 1जण दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार घेत होता. (Six people died in Goa yesterday due to corona)

रविवारी 3,448 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातून 75 नवे बाधित आढळले. 149 बाधित बरे झाले. सध्या राज्यात 1,158 सक्रिय बाधित असून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 3,132 झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 97.48 वर पोचली आहे.

10 लाख लोकांना पहिला डोस

राज्यातील 10 लाख 559 लोकांना काल कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस पूर्ण झाला. दरम्यान राज्यात असलेल्या किंवा अडकून पडलेल्या हजारो विदेशी नागरिकांना लस घेण्याची परवानगीच दिलेली नाही. कोरोनाचा एक सुपर स्प्रेडर रुग्ण 300 लोकांना बाधित करतो, हा अनुभव असल्याने या विदेशी नागरिकांकडून ही स्थानिक नागरिकांना कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे त्यांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी गोव्यात करण्यात येत आहे. सध्या तरी कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे.

‘कोविड’च्‍या तिसऱ्या लाटेसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ सज्ज

सध्या या गोवा इस्पितळात सुसज्ज अशा बाल उपचार विभागाबरोबरच (Child care ward) 7 खाटांचा हायडिपेडन्सी विभाग, तसेच 12 खाटांचा नवजात बालकांवर (Neonate) उपचार करण्यासाठी विभाग सुरू करण्यात आला आहे. त्याशिवाय लहान मुलांना उष्णता देणारे व्होर्मर, सिरिंग पंप्‍स, मल्‍टिपॅरा मॉनिटर्स, फोटोथेरपी मशीन, लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर (Ventilator) अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

तिसऱ्या लाटेत 8 वर्षांखालील मुलांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने, त्यांच्यावर कसे उपचार करावेत यासाठी परिचारिकांनाही (Nurse) प्रशिक्षण दिल्‍याची माहिती डॉ. आल्मेदा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT