no-confidence motion against Sarpanch Dainik Gomantak
गोवा

Curti Panchayat : कुर्टी सरपंच नावेद तहसीलदार यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल

सहा पंच सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या सचिवांकडे ठराव दिला

Rajat Sawant

कुर्टी सरपंच नावेद तहसीलदार यांच्या विरोधात आज गुरुवारी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. आज सहा पंच सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या सचिवांकडे हा अर्ज सुपूर्द केला. यावेळी अर्जात अविश्वास ठराव दाखल करण्याची तीन कारणे नमुद केली होती. सहा पंच सदस्यांनी त्यावर सह्या केल्या आहेत.

अविश्वास ठराव दाखल करण्याची तीन कारणे यावेळी पंच सदस्यांनी अर्जात नमुद केली आहेत. गावच्या महत्वाच्या विकास कामांच्या निर्णयांमध्ये सरपंच नावेद तहसीलदार पंच सदस्यांना विश्वासात घेत नाहीत तसेच पंचायत हितविरोधी काम करणे व सरपंच पंचायतीचा कारभार चालवण्यास अकार्यक्षम आहेत ही 3 कारणे पंचांनी अर्जात नमुद केली आहेत.

काही दिवसांपूर्वी कुर्टी येथील सरपंचासह पंचायत सदस्याला धक्काबुक्की आणि शिविगाळ केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी फोंडा पोलिसांत गोपीनाथ नाईक याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

कुर्टी-खांडेपार पंचायतक्षेत्रातील नागझर भागात गोपीनाथ नाईक याचा गुरांचा गोठा आहे. ना हरकत दाखल्यासाठी गोपीनाथने पंचायत सचिवांकडे मागणी केली.

त्यावर सचिवाने त्याला नियमानुसार फाईल तयार करण्यास सांगितले. त्यानंतर सरपंच नावेद तहसीलदार यांनीही दाखल्यासाठी तीन वेगवेगळ्या फाईल्स तयार करून त्यात आवश्‍यक कागदपत्रे जोडण्यासंबंधी सांगितले.

मात्र, या ना त्या कारणाने आपल्याला रखडवले जात असल्याचा आरोप करत गोपीनाथ यांनी सरपंच, तहसीलदार, पंचसदस्य बाबू च्यारी यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी उपनिरीक्षक आदित्य वेळीप पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT