Goa Medical College Hospital  Dainik Gomantak
गोवा

Goa: अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा, जीएमसीत उपचार सुरु; मये-डिचोलीतील घटना

Maye Bicholim Mushroom Poisoning: मये-डिचोली येथील एकाच कुटुंबातील सहा जणांना अळंबी खाल्ल्यानंतर विषबाधा झाली आहे.

Manish Jadhav

डिचोली: मये-डिचोली येथील एकाच कुटुंबातील सहा जणांना अळंबी खाल्ल्यानंतर विषबाधा झाली आहे. त्यांना तातडीने बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज (GMC) मध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबातील सदस्यांनी डिचोली बाजारातून अळंबी विकत घेतली होती. ती घरी आणून शिजवून खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. लक्षणे दिसताच, त्यांना त्वरित जीएमसीमध्ये हलवण्यात आले.

दरम्यान, अळंबीमधून होणाऱ्या विषबाधेची ही पहिलीच घटना नाही. पावसाळ्यात अनेकदा जंगली अळंबी बाजारात येतात, ज्या विषारी असण्याची शक्यता असते. नागरिकांनी अळंबी विकत घेताना आणि खाताना विशेष काळजी घ्यावी, तसेच खात्रीशीर ठिकाणाहूनच ती खरेदी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT