Sandeep Vazarkar Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case : जमीन हडपप्रकरणी एसआयटीने केली संदीप वजरकरला अटक

संशयित संदीप वझरकर हा माजी जिल्हा पंचायत सदस्य होता तसेच त्याने मागील विधानसभा निवडणूक तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे लढविली होती मात्र पराभव पत्करावा लागला होता.

विलास महाडिक

Goa Land Grabbing Case : जमीन हडपप्रकरणी एसआयटीने काल गुरुवारी रात्री उशिरा पर्वरी येथील संदीप अर्जुन वझरकर (52 वर्षे) याला अटक केली. सांगोल्डा येथील सर्वे क्रमांक 21/31 मधील जमीन खरेदी करण्यासाठी त्याने व त्याचा साथीदार अविनाश नाईक या दोघांनी रक्कम घेऊन फसवणूक केल्याची तक्रार पर्वरीतील पुरुषोत्तम अगरवाल यांना म्हापसा पोलिस स्थानकात दाखल झाली होती.

तक्रारदाराच्या पत्नीकडून भूखंडासाठी 27 लाख रुपये घेतले होते व त्यानंतर भूखंड व पैसेही दिले नाहीत. याप्रकरणी एसआयटीने केलेल्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. संशयित संदीप वझरकर हा माजी जिल्हा पंचायत सदस्य होता तसेच त्याने मागील विधानसभा निवडणूक तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे लढविली होती मात्र पराभव पत्करावा लागला होता.

दरम्यान जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या राजकुमार मैथी याला गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दुसऱ्या गुन्ह्यात याच आठवड्यात सोमवारी (5 सप्टेंबर) अटक केली. पोलिस अधीक्षक निधीन वालसन यांनी मैथीचा त्यांच्या पथकाद्वारे तपास सुरू असलेल्या दुसऱ्या जमीन हडप प्रकरणात सहभाग असल्याचा दुजोरा दिला असून त्याची सध्याची अटक आसगावातील सर्व्हे क्रमांक 33/3 असलेल्या त्याच्या मालमत्तेबाबत आहे. याबाबत नेव्हिल डिसोझा यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला होता. मैथीला मंगळवारी पोलिस कोठडीसाठी म्हापसा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग (जेएमएफसी) यांच्यासमोर हजर करण्यात आले.

गोवा राज्यात बनावट कागदपत्रे तयार करत शासकीय, खाजगी, वारसा नसलेल्या, बक्षिसपात्र जमिनी परस्पर आपल्या नावावर केल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोषींवर कारवाईसाठी आपण सुरुवातीपासून सकारात्मक आहोत असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT