Sirvoi Goa Road News Canva
गोवा

Sirvoi: शिरवईत 15 वर्षांनी होणार रस्ता पूर्ण! डांबरीकरण कामास सुरुवात; ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश

Shirvai Goa: सोमेश्वर देवस्थानाजवळ सुमारे पंधरा घरे असून या लोकांना गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने त्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता.

Sameer Panditrao

केपे: शिरवई येथील सोमेश्वर देवस्थानजवळ असलेल्या गावातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी गेल्या पंधरा वर्षापासूनची लोकांची मागणी अखेर पूर्ण होत आहे. केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्या हस्ते या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. या कामाचा शुभारंभ करताना आपल्यालाही मोठा आनंद होत असल्याचे यावेळी डिकॉस्टा यांनी यावेळी सांगितले.

सोमेश्वर देवस्थानाजवळ सुमारे पंधरा घरे असून या लोकांना गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने त्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता. त्यातच आता लोकविश्वास प्रतिष्ठानने खास मुलांसाठी नवीन विद्यालय सुरू केले आहे. त्यामुळे या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा बराच त्रास होत होता.

गेल्या पंधरा वर्षांपासून लोक या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, याची वाट पाहत होते. त्यांनी अनेकवेळा मागणी सुद्धा केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत गेले.

आमदार डिकोस्टा यांनी लोकांना निवडणुकीच्या काळात या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येइल, असे आश्वासन दिले होते. त्यांनी आपला शब्द पाळला.त्यामुळे या परिसरातील लोकांनी सुद्धा त्यांचे आभार मानले.श

डिकॉस्टा म्हणाले, की केपे मतदारसंघात विकासकामे करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे सहकार्य मिळत आहे. सध्या पन्नास टक्के रस्त्याचे काम पूर्ण झाले असून पन्नास टक्के काम जमिनीच्या मालकांच्या ना हरकत दाखले मिळाल्यानंतर लगेच पूर्ण करण्यात येणार आहे.

लोकविश्वास प्रतिष्ठानने खास मुलांसाठी गेल्या एक वर्षांपासून याठिकाणी नवीन इमारतीत स्थलांतरित केले होते पण येथे येण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. त्यामुळे विद्यार्थी तसेच शिक्षकांनाही बराच त्रास सहन करावा लागला. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी विद्यालयाच्या मंडळाने सुद्धा आमदार डिकोस्टा यांच्याकडे मागणी केली होती, असे विद्यालयाच्या शिक्षकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT