Illegal Parking | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa News: शिवोली बाजारात बेशिस्त पार्किंग

Goa News: शिवोली-मार्ना पंचायत, पोलिसांतर्फे दंडात्मक कारवाई

दैनिक गोमन्तक

Goa News: येथील मासळी मार्केटात विक्रेत्यांकडून बेकायदा वाहने कुठेही, वेडीवाकडी उभी केली जातात. ही एक मोठी समस्या निर्माण झाली होती. याबाबत संबंधित वाहनचालकावर शुक्रवारी मार्ना-शिवोली पंचायत, हणजुण पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.

सरपंच शर्मीला वेर्णेकर, उपसरपंच विलीयम फर्नांडिस, पंच संदेश हडफडकर, सिंपल धारगळकर, अमीत मोरजकर तसेच हणजुण वाहतूक पोलिस कक्षाचे पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई भाग घेतला.

तारची- भाट परिसरात मासळी विक्रीसाठी सिंधुदुर्गातील शिरोडा, वेंगुर्ला तसेच मालवण येथून मासळी विक्रीसाठी येणारे वाहनचालक दिवसभर आपली चारचाकी वाहने येथील पार्किंग क्षेत्रात कुठेही, कशीही ठेवतात. त्यामुळे बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्यांची गैरसोय होते. वाहने कुठे उभी करावी, ही मोठी समस्या निर्माण होते.

वाहन पार्किंगला शिस्त लावावी, अशी स्थानिकांची मागणी होती. त्यामुळे आज पंचायत व पोलिसांनी ही कारवाई केली. याबाबत शिवोलीतील समर्थन संघटनेचे अध्यक्ष प्रेमानंद आरोलकर, नितीन आगरवाडेकर यांनी पोलिस कक्षाचे निरीक्षक गौरीष परब, उपनिरीक्षक वामन नाईक आणि मार्ना-शिवोली पंचायत मंडळाचे अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

SCROLL FOR NEXT