Siolim MLA Delilah Lobo  Dainik Gomantak
गोवा

Anjuna: E-Cigarettes च्या शॉपवर महिला आमदाराचा छापा; वेप, हुक्का दुकांनावर बंदीची मागणी

MLA Delialah Lobo: कोणत्याही वैध परवानागीशिवाय याची विक्री सुरु असल्याचा आरोप आमदार लोबो यांनी केला.

Pramod Yadav

Siolim MLA Delilah Lobo

हणजूण: शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी हणजूण - वागातोर येथील ई-सिगारेटच्या शॉपवर पोलिसांसमवेत छापेमारी केली. यात दुकानातून ई-सिगारेट, वेप आणि हुक्का यासारख्या गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. अशा अवैध दुकानांवर कारवाईची मागणी लोबो यांनी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलायला लोबो यांनी हणजूणचे पोलिस निरीक्षक सुरज गवस यांच्यासह हणजूण - वागातोर परिसरातील ई-सिगारेट, वेप आणि हुक्का दुकानांवर छापेमारी केली. छापेमारीत दुकानातून वरील वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. कोणत्याही वैध परवानागीशिवाय याची विक्री सुरु असल्याचा आरोप आमदार लोबो यांनी केला.

राज्यात अशा पद्धतीने ई-सिगारेट, वेप आणि हुक्का विक्री होत असलेल्या दुकानांवर कारवाई करण्याची मागणी आमदार दिलायला लोबो यांनी केली. उपजिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून अशा दुकानांना टाळे ठोकण्याची विनंती केली. दरम्यान, राज्यात पर्यटन हंगाम सुरु झाला असल्याने देश - विदेशातील पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात अवैध गोष्टी विक्री होण्याचा धोका वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT