Indian Coast Guard Rescue Operation ANI
गोवा

Parth Ship: अन् 19 जणांचे प्राण वाचले; बुडत्या जहाजातील खलाशाने सांगितला थरारक अनुभव

पार्थ हे दुबईहून – बेंगलोरच्या दिशेने जाणारे तेलवाहू जहाज बुडाले

Sumit Tambekar

शुक्रवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी 'पार्थ' हे दुबईहून – बेंगलोरच्या दिशेने जाणारे तेलवाहू जहाज मुरगाव - रत्नागिरी किनाऱ्यापासून 80 नॉटिकल मैलावर बुडाले. याची वेळेत माहिती मिळाल्याने भारतीय तटरक्षक दलाने प्रयत्नांची शिकस्त करत सर्वच्या सर्व खलाशांना वाचवले. या जहाजावर असणाऱ्या एका इथिओपियन नागरिकाने आपला जीव कसा वाचला याचा थरारक अनुभव कथन केला आहे.

(coast guard rescues 19 sailors from sinking parth ship in murgaon ratnagiri Thrilling experience told by the sailors ship)

शुक्रवारी सूर्य उगवताच तेलवाहतूक करणारे जहाज उजवीकडे झुकत पाण्यात जाऊ लागलं. अन् कप्तानने आम्हा सर्वांना त्याचवेळी ''जहाज बुडते आहे. सर्वांनी जहाज सोडून आपले जीव वाचवा'' असा स्पष्ट इशारा दिला म्हणून आम्हा 19 जणांचे प्राण वाचले असल्याचं या इथिओपियन नागरिकाने आपला अनुभव कथन केला. त्यावेळी कप्तान आम्हास सतर्क करत नसता तर आज आम्ही जिवंत नसतो असे ही तो म्हणाला.

काय झालं होतं नेमकं ?

दुबईहून – बेंगलोरच्या दिशेने जाणारे तेलवाहू जहाज तळाला भोक पडल्याने मुरगाव - रत्नागिरी किनाऱ्यापासून 80 नॉटिकल मैलावर बुडाले. सुदैवाने या जहाजावरील सर्व 19 कर्मचाऱ्यांना वाचविण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. ही घटना शुक्रवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.

जहाज बुडत असल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी तटरक्षक दलाशी संपर्क साधला. त्यानंतर रत्नागिरी येथील तटरक्षक दलाने येऊन या जहाजावरील 19 कर्मचाऱ्यांना वाचविले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, गेले काही दिवस समुद्रात जोरदार वादळी वारे वाहत आहेत. समुद्रही खवळला आहे.

त्यातच मागील चार दिवसांपूर्वी समुद्रात वादळी वारे मोठय़ा प्रमाणावर वाहत असल्याने मासेमारी करणाऱ्या गुजरात, रत्नागिरीपासूनच्या अनेक नौका देवगड येथील बंदरात सुरक्षितस्थळी दाखल झाल्या आहेत. असे असताना नेमक जहाजात थेट पाणी शिरु लागल्याने हे जहाज बुडाल्याची घटना घडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT