Hema Sardesai condemns Gautam Khattar  Dainiak Gomantak
गोवा

"बाहेरील व्यक्तींनी गोव्यात येऊन विष कालवू नये", गौतम खट्टरवर गायिका हेमा सरदेसाईंचा हल्लाबोल; पूर्वजांना दुखावणं हिंदुत्‍व नाही!

Hema Sardesai condemns Gautam Khattar: सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍याबाबत आक्षेपार्ह विधाने केल्‍यानंतर तुरुंगाची हवा खाऊन बाहेर पडलेल्‍या गौतम खट्टरने राज्‍यातील पत्रकारांबाबतही मुक्ताफळे उधळली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांच्‍याबाबत आक्षेपार्ह विधाने केल्‍यानंतर तुरुंगाची हवा खाऊन बाहेर पडलेल्‍या गौतम खट्टरने राज्‍यातील पत्रकारांबाबतही मुक्ताफळे उधळली. या घटनेबाबत प्रसिद्ध गायिका हेमा सरदेसाई यांनी त्‍याचा जाहीर निषेध केला. अशा व्‍यक्ती गोव्‍यात येऊन राज्‍यातील धार्मिक सलोखा बिघडवण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. त्‍यामुळे गोमंतकीय जनतेने त्‍यांना बळी पडू नये, असे आवाहनही त्‍यांनी रविवारी पणजीतील आझाद मैदानावर घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत बोलताना केला.

‘जगात देव एकच आहे. परंतु, त्‍याची नावे वेगवेगळी आहेत. गोवा ही अनेक देव–देवतांची भूमी आहे. धार्मिक सलोख्‍याबाबत गोवा जगभर प्रसिद्ध आहे. परंतु, काही व्‍यक्ती इतर प्रांतांतून गोव्‍यात येऊन देव–देवतांबाबत आक्षेपार्ह विधाने करीत राज्‍यातील धार्मिक सलोखा बिघडवू पाहत आहेत. अशांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे.

पूर्वजांना दुखावणे हिंदुत्‍व नाही!

‘गोव्‍यातील अनेक हिंदूंनी ख्रिस्‍ती धर्मांतरण केले. त्‍यामुळे ख्रिश्‍‍चनही मूळचे हिंदूच आहेत. त्‍यांच्‍यात हिंदूंचेच रक्त आहे. याचे भान बाहेरून गोव्‍यात येणाऱ्यांनी ठेवले पाहिजे. पूर्वजांना दुखावणे हे हिंदुत्‍व नव्हे’, असेही सरदेसाई म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT