Sindhudurg Chipi Airport
Sindhudurg Chipi Airport 
गोवा

Sindhudurg Chipi Airport: गणपतीपूर्वी कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! चिपीतून सुरू होणार विमानसेवा

Pramod Yadav

Sindhudurg Chipi Airport: गणपतीपूर्वी कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरील विमानसेवा सुरळीत होणार आहे.

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्यजी शिंदे यांनी याबाबत ग्रीन सिग्नल दिला असून, मुंबई -गोवा महामार्गाचे काम रखडले असताना विमानसेवेची बातमी कोकणवासीयांसाठी दिलासा देणारी आहे. महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली आहे.

'सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर पुरेशी विमानसेवा पुरवण्यामध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या. काही दिवसांपूर्वी विमानतळाला भेट देऊन, अधिकार्‍यांकडून येत असलेल्या अडचणी समजून घेतल्या. त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन तसेच गणेशोत्सवापूर्वी विमानतळावरील विमानसेवा पुन्हा सुरळीत सुरू होतील असा शब्द कोकणवासीयांना दिला होता. हा शब्द खरा करू शकलो याचं समाधान आहे.'

'आज दिल्ली येथे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्यजी शिंदे यांची चिपी विमानतळावरील प्रवासी विमान संदर्भात भेट घेतली. 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होत असून याआधी ही प्रवासी विमान सेवा सुरळीत सुरु करण्याची विनंती या भेटीत त्यांना केली. तेव्हा मा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, ही विमान सेवा येत्या 01 सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले.' असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.

'केंद्रीय मंत्री नारायण राणेजी देखील यासाठी पाठपुरावा करत होते. आमच्या संयुक्त प्रयत्नांचे यश म्हणून येत्या सप्टेंबर पासून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई ही प्रवासी विमान सेवा चिपी विमानतळावरून नियमितपणे सुरू होणार आहे. दर आठवड्याला एअर अलांयन्स व इंडिगो या दोन विमान कंपन्यांच्या मार्फत ही विमानसेवा सुरु असेल.'

'गणेशोत्सव म्हणजे तुम्हा-आम्हा कोकणवासीयांसाठी आनंदोत्सव ! गेले अनेक महिने प्रलंबित असणार्‍या चिपी विमानतळाच्या विमानसेवेचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे या आनंदात अजून भर पडली आहे. खर्‍या अर्थाने कोकणवासीयांना गणपती बाप्पा पावला असंच म्हणता येईल.' अशी माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली आहे.

समस्त कोकणवासीयांच्या वतीने मंत्री चव्हाण यांनी ज्योतिरादित्यजी शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Gallantry Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शूरवीरांना किर्ती अन् शौर्य चक्र प्रदान

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT