Silent Inveterate Serial Killer book Dainik Gomantak
गोवा

Dupatta Killer Mahanand Naik: 16 खून करणाऱ्या गोव्यातील दुपट्टा किलर 'महानंद'वर आले पुस्तक; वाचायला मिळणार रक्तरंजित इतिहास

Silent Inveterate Book on Mahanand Naik: आवदा व्हिएगस यांच्‍या ‘अ सायलेंट इन्व्हेटरेट सिरीयल किलर’ या पुस्‍तकाचे पाटील यांच्‍या हस्‍ते प्रकाशन झाले. यावेळी या प्रकल्‍पात संशोधन करणाऱ्या ॲड. सुगंधी एन. उपस्‍थित होत्‍या.

Sameer Panditrao

मडगाव: महिला आणि मुले अनेकदा गुन्हेगारांच्‍या भुलभुल्‍लयाला बळी पडतात, गुन्हेगार त्यांचे शोषण करतात. गोव्‍यात काही वर्षांपूर्वी घडलेल्‍या सिरियल किलर महानंद नाईक याच्‍या गुन्‍हेगारी कृत्‍याकडे त्‍याच दृष्‍टीने बघण्‍याची गरज आहे. महानंदने कित्‍येक भोळ्‍याभाबड्या युवतींवर अत्‍याचार करून त्‍यांचे जीवन उध्‍वस्‍त केले. त्‍याचा हा गुन्‍हा मानवतेला काळिमा फासणारा होता, अशी प्रतिक्रिया या प्रकरणातील तपास अधिकारी असलेले माजी उपअधीक्षक सी.एल. पाटील यांनी व्‍यक्‍त केली.

आवदा व्हिएगस यांच्‍या ‘अ सायलेंट इन्व्हेटरेट सिरीयल किलर’ या पुस्‍तकाचे पाटील यांच्‍या हस्‍ते प्रकाशन झाले. यावेळी या प्रकल्‍पात संशोधन करणाऱ्या ॲड. सुगंधी एन. उपस्‍थित होत्‍या. हे पुस्‍तक सिरीयल किलर महानंद नाईक याच्या गुन्ह्यांवर प्रकाश टाकणारे असून ते ‘बायलांचो एकवोट’ या संघटनेने प्रकाशित केले आहे.

महिला आणि लहान मुले गुन्‍हेगारांच्‍या कृत्‍यांना कसे बळी पडतात आणि त्यांचे नंतर कसे शोषण केले जाते, हे या पुस्तकात अधोरेखित केले आहे. महानंदने कायद्याच्या अंमलबजावणीची दिशाभूल कशी केली आणि महत्त्वाचे पुरावे कसे नष्ट केले. ज्यामुळे त्याचे अनेक खून, आत्महत्या म्हणून दिसून आले, याचे तपशीलवार वर्णन त्‍यात केले आहे.

ॲड. सुगंधी म्हणाल्या, सिरीयल किलर आणि त्‍यांच्‍याकडून होणाऱ्या शोषणाच्‍या धोक्यांबद्दल लोकांना जागृत करणे, हा या पुस्‍तकामागचा मूळ हेतू आहे. व्हिएगस म्हणाल्या, हे पुस्तक केवळ गुन्ह्यांचे वर्णन नाही, तर समाज अशा घटनांना उदासीन वृत्तीने कसे दुर्लक्षित करतो, याचे प्रतिबिंब आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei River: कर्नाटकचे पितळ उघडे! खोट्या माहितीद्वारे घेतले जागतिक बँकेचे कर्ज! 'म्‍हादई'प्रश्‍नी गोवा सरकार देणार पुरावे

Mhaje Ghar: एक कार्यक्रम, 173 बैठका! ‘माझे घर’साठी भाजपने केले सूक्ष्म नियोजन; लाभार्थ्यांपर्यंत अर्जांसह पोहोचणार कार्यकर्ते

Horoscope: आत्मविश्वास उंचावेल,नात्यांमध्ये विश्वास वाढेल; 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक

India vs Pakistan: पाकिस्तान पुन्हा फेल! टीम इंडियानं 88 धावांनी चारली पराभवाची धूळ, दीप्ती-क्रांतीची भेदक गोलंदाजी

LIVE सामन्यात भयंकर राडा; भारताच्या खेळाडूंमध्ये 'तू तू- मै मै', एकमेकांच्या अंगावर धावून गेले; अंपायर नसता तर... Watch Video

SCROLL FOR NEXT