Siddhi Naik Dainik Gomantak
गोवा

Siddhi Naik Murder Case: सिद्धी नाईकच्या वडिलांची खटला पुन्हा सुरू करण्याची मागणी

सीबीआय चौकशीची ही केली मागणी

दैनिक गोमन्तक

गेल्या वर्षी 12 ऑगस्ट रोजी घडलेल्या सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. सिद्धी नाईक या 19 वर्षीय मुलीचा मृतदेह कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर या प्रकरणाला अनेक वेगवेगळी वळणे घेत आहे.

(Siddhi Naik's father's demand to reopen the case along with Tara Kerkar)

सिद्धीच्या घरच्यांनी आणि गोव्यातील जनतेने सिद्धीला न्याय मिळवा यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र आता संबंधित कोणतेही पुरावे सापडले नसल्याने सिद्धी नाईकची फाईल क्राईम ब्रांचकडून बंद करण्यात आली होती. मात्र हा खटला पुन्हा सुरू करण्याची मागणी सिद्धी नाईकच्या वडिलांची केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धी नाईकच्या वडिलांसह सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी हा खटला पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. कोणताही पुरावा सापडला नसल्याचे सांगत केस बंद करण्यात आली होती. मात्र त्यांनी सीबीआय चौकशीची मागणीही केली आहे. याबाबत तारा केरकर यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात बरेच पुरावे आहेत. जे प्रकरण हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामूळे सिद्धीला न्याय मिळण्यासाठी हे प्रकरण पून्हा सुरु करा असे त्यांनी म्हटले आहे.

नेमके काय प्रकरण ?

12 ऑगस्ट 2021 रोजी कळंगुट समुद्रकिनारी गूढ परिस्थितीत तिचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला होता. सिद्धी नाईकच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी न्यायाची मागणी करत जोर धरला होता. त्या धर्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली; मात्र पुराव्यांच्या अभावामुळे ही केस बंद करण्यात आली आहे. यावर सिद्धी नाईकच्या वडिलांसह सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांनी हा खटला पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT