Siddhi Naik Murder Case Dainik Gomantak
गोवा

Siddhi Naik Murder Case : सिद्धी नाईक खून प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचने थांबवला; केस फाईल बंद!

पुराव्यांच्या अभावामुळे Siddhi Naik Murder केस बंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

गेल्या वर्षी 12 ऑगस्ट रोजी घडलेल्या सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. सिद्धी नाईक या 19 वर्षीय मुलीचा मृतदेह कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर या प्रकरणाला अनेक वेगवेगळी वळणे आली. सिद्धीच्या घरच्यांनी आणि गोव्यातील जनतेने सिद्धीला न्याय मिळवा यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र आता संबंधित कोणतेही पुरावे सापडले नसल्याने सिद्धी नाईकची फाईल क्राईम ब्रांचकडून बंद करण्यात आली आहे.

(Siddhi Naik Murder Case file closed by crime branch)

मिळालेल्या माहितीनुसार, ‘आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास केला आहे. या खटल्यातील आणखी साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत, परंतु काहीही सापडले नाही. त्यामुळे आता आम्ही क्लोजर रीपोर्ट दाखल केला आहे. यापुढील निर्णय कोर्ट देईल, असे एक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

गेल्यावर्षी कळंगुट समुद्रकिनारी गूढ परिस्थितीत तिचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला होता. सिद्धी नाईकच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाइकांनी न्यायाची मागणी करत जोर धरला होता. त्या धर्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली; मात्र पुराव्यांच्या अभावामुळे ही केस बंद करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT