Hit and Run Accident News Dainik Gomantak
गोवा

Hit And Run Case : पाठीमागून आला आणि धडक देवून पसार झाला; अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी

अपघाताची घटना ताळगाव पठारावर घडली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Hit And Run case : राज्यात भरधाव वेगाने वाहने चालवून अपघातास निमंत्रण देण्याचे प्रकार वाढतच आहेत. अशीच एक अपघाताची घटना ताळगाव पठारावर घडली आहे. येथील श्‍यामा मुखर्जी स्टेडियमजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली असून तीला गोमेकॉत भरती करण्यात आले आहे.

आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताळगाव येथे राहत असलेली एक महिला दुचाकीने दोनापावल ते बांबोळीच्‍या दिशेने जात होती. यावेळी त्या श्‍यामा मुखर्जी स्टेडियमजवळ पोहचल्या असता मागून आलेल्या एका गाडीने त्यांच्या स्कुटरला ठोकर दिली.

या धडकेत महिलेचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्या खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. जखमी महिलेला तात्काळ गोमेकॉत दाखल करण्यात आले. तर धडक देणारा गाडीचा चालक अपघातानंतर न थांबता त्याने तेथून पळ काढला.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने गाडी चालकाचा शोध घेण्यात आला असून उद्या त्याला गाडीच्या दस्तावेजासह पोलिस स्थानकात बोलवण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT