Tanvi Ghadi Firing Death Dainik Gomantak
गोवा

गोळी झाडली ती बंदूक बेकायदेशीर, श्‍‍वेत गावडेला खुनाच्‍या आरोपाखाली अटक; 4 दिवसांची पोलिस कोठडी

Tanvi Ghadi Firing Death: हातातील बंदूक गोळ्यांनी भरलेली आहे, याची कल्पना नसताना केलेली एक निष्काळजी कृती जीवघेणी ठरली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: हातातील बंदूक गोळ्यांनी भरलेली आहे, याची कल्पना नसताना केलेली एक निष्काळजी कृती जीवघेणी ठरली. श्वेत गावडे याने मस्करीतून तन्‍वी घाडी हिच्यावर बंदूक रोखून चाप ओढला आणि क्षणार्धात सुटलेली गोळी तिच्या मानेत घुसली.

या दुर्दैवी घटनेत तन्‍वीचा मृत्यू झाला. या प्रकरणी केपे पोलिसांनी श्वेत गावडे याला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्‍याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली आहे. ज्‍या बंदुकीतून गोळी झाडली ती बेकायदेशीर असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

शस्त्रास्त्र कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाळी-साखळी येथील श्वेत हा व्यवसायाने क्रेन ऑपरेटर आहे. साखळीतील वीज खात्यात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहे.

तर, तन्‍वी घाडी ही त्याची मैत्रीण होती. तन्‍वीसह आणखी तिघांसोबत तो काजूर-केपे येथे, लग्न करून दिलेल्या एका मैत्रिणीच्या घरी गेला होता.

केपेचे पोलिस निरीक्षक प्रशाल नाईक देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात बंदूक असल्याची माहिती मिळताच श्वेत गावडे आत गेला आणि ती बंदूक हातात घेतली. मस्करीच्या उद्देशाने त्याने ती तन्‍वीकडे रोखली आणि चाप ओढला. मात्र, बंदूक भरलेली असल्याने गोळी सुटली आणि ती तन्‍वीच्या मानेला लागली.

गोळी लागल्यानंतर तन्‍वीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. तिला खासगी वाहनातून रुग्णालयात नेले जात असतानाच गस्तीवर असलेल्या केपे पोलिसांनी गाडी अडवली. प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तिला तातडीने आपल्या वाहनातून केपे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी केपे पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. बंदूक कशी आणि कुठून आली याचाही शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: फटाका कारखान्यात मोठा स्फोट; 21 जणांचा मृत्यू, 61 जण गंभीर जखमी; थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

Rohit Sharma: 'मुंबईच्या राजा'चं दमदार कमबॅक! LSG विरूध्द रचला इतिहास, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

Horoscope: मोठा मंगळ अन् संकष्टीचा वरदान! बाप्पाच्या कृपेने 'या' राशींचे टेन्शन कायमचे मिटणार, रखडलेली कामे पूर्ण होणार

काजू हंगाम ओसरला, फेणीच्या भट्ट्या थंडावल्या, बोंडूच्या कमतरतेमुळे उत्पादनात 50 टक्के मोठी घट; डिचोलीत फेणीचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

Goa Tiger Death: गोव्याच्या जंगलात सांडतेय वाघांचे रक्त! प्रशासनाची मात्र डोळेझाक; केरी, गोळावली नंतर आता साकोर्डा,वाघांच्या हत्यांची मालिका थांबेना

SCROLL FOR NEXT