Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

37th National Games 2023: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मला सहभागी करून घेतले जात नाही श्रीपाद नाईक यांची नाराजी

37th National Games 2023: गोव्याच्या सरकारने माझे राजकीय महत्त्व कमी करण्यासाठीच मला डावलणे चालविले आहे आणि मी गोवा ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष असतानाही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मला खिजगणतीत घेतले नाही,

दैनिक गोमन्तक

37th National Games 2023: `गोव्याच्या सरकारने माझे राजकीय महत्त्व कमी करण्यासाठीच मला डावलणे चालविले आहे आणि मी गोवा ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष असतानाही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मला खिजगणतीत घेतले नाही, अशी तक्रार केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी केंद्रीयमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यापुढे भाजप समर्थक आमदारांसमोर केली,

परंतु हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या भाजपच्या प्रमुख नेत्यांनी हसण्यावारी नेल्याची माहिती उपलब्ध झाली. आश्‍चर्य म्हणजे, श्रीपाद नाईक पाचवेळा खासदार म्हणून जिंकून आले असून आपली कैफियत ते राज्यसभेवर निवडल्या गेलेल्या राजीव चंद्रशेखर यांच्यापुढे मांडत होते. ‘‘मी गोवा ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष असतानाही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या गोव्यात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये माझा कोणताच सहभाग ठेवलेला नाही’’, अशा नेमक्या शब्दांत श्रीपाद नाईक यांनी आपली खंत व्यक्त केली.

आपल्याला स्थानिक राजकारणात विश्‍वासात घेतले जात नाही, आमंत्रणेही आपल्याला मिळत नाहीत, अशी तक्रार श्रीपाद नाईक यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भातील या बैठकीत व्यक्त केली. मुख्यमंत्रिपदी मनोहर पर्रीकर असताना श्रीपाद नाईक आपल्यावर अन्याय होत असल्याची तक्रार करायचे व राज्यात मुख्यमंत्री म्हणून नेमणूक व्हावी म्हणूनही त्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. परंतु भाजपमध्ये त्यांची अवहेलना सुरू आहे,

ही बाब भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनीही ‘गोमन्तक’शी बोलताना मान्य केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे होते व स्टेडियमवर एस्कॉर्ट करण्याचे कामही या दोन्ही नेत्यांनी केले. स्वत: पंतप्रधानांनीही आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री असलेल्या श्रीपाद नाईक यांचे नाव घेतले नाही, मात्र केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचे नाव घ्यायला ते विसरले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT