37th National Games 2023: भंडारी समाजात कमालीची अस्वस्थता

37th National Games 2023: श्रीपादभाऊंचा अवमान : फातोर्ड्यातील सोहळ्यात स्वयंपूर्ण रथावर स्‍थान न दिल्‍याने अनेकांची धारणा
37th  National Games 2023
37th National Games 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

अवित बगळे

37th National Games 2023: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्‍घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत स्वयंपूर्ण रथावर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना स्थान न दिल्याचे पडसाद इतर मागासवर्गीयांतील सर्वांत मोठा समाज असलेल्या भंडारी समाजात उमटले आहेत.

37th  National Games 2023
Vladimir Putin: 'हुकूमशहा वेळोवेळी बदललेले आहेत; युद्धात रशिया पराभूत झाली तर पुतीन यांना...'- रशियन मुत्सद्द्याचे मोठे वक्तव्य

हा नाईक यांचा अवमान आहे, असे त्या समाजाच्या नेत्यांना वाटत असून, त्यांनी समाज माध्यमांवर तसे उघडपणे लिहिलेही आहे. आपल्या स्वभावानुसार नाईक यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली नसली तरी त्यांच्या निकटवर्तीयांतही याविषयावरून असंतोष निर्माण झाल्‍याची माहिती मिळाली आहे.

भाजपचे सर्वांत पहिले विधिमंडळ गट नेते

असलेले नाईक यांना मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल का मारता आली नाही याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. उत्तर गोव्यातून पाच वेळा खासदारपदी निवडून आलेल्या नाईक यांचे राजकीय खच्चीकरण कसे करण्यात आले याच्या सुरस कथाही यानिमित्ताने आता ऐकू येऊ लागल्या आहेत.

37th  National Games 2023
Fortified Rice: फॉर्टिफाईड तांदळावरून स्वस्त धान्य दुकानदार चिंताग्रस्त

भारतीय ऑलिंपिक संघटना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेते. साहजिकपणे या संघटनेचे अध्यक्ष प्रमुख नाईक हे स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यावर केंद्रस्थानी असणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही. ही स्पर्धा जणू सरकारचीच आहे, असे चित्र निर्माण होत गेले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्यासमोर नाईक झाकोळत गेले आणि त्यांचे अस्तित्व केवळ उद्‍घाटन सोहळ्यात उपस्थितांपैकी एक एवढेच राहिले होते.

नेहमीच अवहेलना?

या साऱ्या घडामोडींना फातोर्डा स्टेडियमवरील घटनेच्या निमित्ताने वाचा फुटली आहे, वास्तवात ही नाराजी तशी काही महिन्यांपासून आहे. झुआरी पुलाची एक बाजू खुली करण्यात आली त्यावेळी महनीय व्यक्तींसाठीच्या बग्गीत नाईक यांना स्थान मिळाले नव्हते. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय निधीतून झालेल्या पर्यटन खात्याच्या कार्यक्रमात केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून नाईक यांना स्थान देण्यात आले नव्हते.

ही झाली अलीकडची उदाहरणे; पण नाईक यांना सातत्याने राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न तसा जुनाच आहे. आता तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नख लावण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने त्यांचे पाठीराखे व्यक्त होऊ लागले आहेत.

काय घडले?

  • फातोर्डा स्टेडियमवर झालेल्या उद्‍घाटन सोहळ्यात स्वयंपूर्ण रथावर पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री असणे साहजिक होते.

  • त्यांच्यासोबत ज्या संघटनेची स्पर्धा आहे त्या संघटनेचे अध्यक्ष या नात्याने श्रीपाद नाईक असणे स्वाभाविक होते.

  • मात्र, राज्यसभेचे सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना त्या रथावर स्थान देण्यात आले.

  • मुख्यमंत्र्यांनंतर राज्यातील महत्त्वाची राजकीय व्यक्ती कोण, याचा अप्रत्यक्ष संदेश त्यातून देण्यात आला, अशी अनेकांची धारणा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com