Shrikrishna Parab, Amit Palekar, Arvind Kejriwal  X
गोवा

Goa AAP: ‘आप’मध्ये दाखल होताच परबांवर मोठी जबाबदारी, महासचिवपदी नियुक्ती; राजकीय सामर्थ्यासाठी प्रवेश केल्याचे प्रतिपादन

Shrikrishna Parab: परब म्हणाले, गोव्यात राजकीय परिवर्तनाची माझी मोहीम ५-६ वर्षांपूर्वी सुरू झाली. ‘आप’ने दिल्लीत काँग्रेस सरकार हटवून लोकाभिमुख प्रशासन उभारले.

Sameer Panditrao

पणजी: ‘रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी’चे सहसंस्थापक श्रीकृष्ण परब यांनी गुरुवारी दिल्लीत आम आदमी पक्षात प्रवेश केला. ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. परब यांनी पक्षात प्रवेश करताच त्यांची राज्याचे महासचिव (संघटन) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास पक्षाच्या नेत्या आतिषी, राष्ट्रीय सचिव व गोवा प्रभारी पंकज गुप्ता, गोवा प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर उपस्थित होते.

आतिषी म्हणाल्या ‘आप’ आता केवळ दिल्लीपुरता मर्यादित पक्ष राहिला नाही. पंजाबमध्ये प्रथमच निवडणूक लढवताच ‘आप’ मुख्य विरोधी पक्ष ठरला. गोव्यातही दोन आमदार निवडून आले. गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्येही जनतेने आमच्यावर विश्वास टाकला आहे. यावेळी ॲड. पालेकर व पंकज गुप्ता यांनी गोव्यातील भाजप सरकारवर टीका केली.

राजकीय सामर्थ्य गरजेचे!

परब म्हणाले, गोव्यात राजकीय परिवर्तनाची माझी मोहीम ५-६ वर्षांपूर्वी सुरू झाली. ‘आप’ने दिल्लीत काँग्रेस सरकार हटवून लोकाभिमुख प्रशासन उभारले, त्यातून आपणास प्रेरणा मिळाली. आपण आंदोलनांमधून सुरुवात केली; पण नंतर जाणवले की बदल घडवण्यासाठी राजकीय सामर्थ्य हवे. त्यासाठी ‘आप’मध्ये प्रवेश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो" डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT