Locked Shree Bhumika Temple Ashwem, Goa Dainik Gomantak
गोवा

Bhumika Temple: नवरात्रीच्या पूर्वसंध्येला भूमिका मंदिराला टाळा कोणी लावला; दोन गट आमने - सामने, हस्तक्षेप न करण्याची सूचना

गोमन्तक डिजिटल टीम

Shree Bhumika Temple Ashwem, Goa

मोरजी: नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला आश्वे-मांद्रे येथील श्री भूमिका मंदिराच्या गर्भकुडीला अज्ञातांनी टाळे ठोकल्यामुळे वातावरण तंग बनले आहे. तेथे दोन गटांमध्ये वाद आहे. मात्र टाळे नेमके कोणी ठोकले, हे उघड झाले नसून पोलिस शोध घेत आहेत.

पेडणे मामलेदार, उपजिल्हाधिकारी परिस्थितीवर नजर ठेवून आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात कोणताही खंड पडू देणार नाही, वाद मिटवला जाईल, असे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी सांगितले.

आश्वे येथील श्री भूमिका देवस्थानच्या दोन गटांतमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. त्यातच काल गर्भकुडीला टाळे ठोकल्यामुळे वातावरण तंग बनले. याची दखल घेऊन पेडणे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी आपल्या कार्यालयात उद्या शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी दोन्ही गटांची बैठक बोलावली आहे.

नवरात्रीचे नऊ दिवसही कार्यक्रमांत कोणत्याच प्रकारचा खंड पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच मांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी दोन्ही - गटांमध्ये वाद सुरू होता.

मात्र पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही गटाला सूचना करताना 'जोपर्यंत हा वाद सुटत नाही, तोपर्यंत कोणी हस्तक्षेप करू नये.

एक गट मानकऱ्यांचा, दुसरा महाजनांचा

या देवस्थानचा एक गट आहे पाच मानकऱ्यांचा तर दुसरा गट अन्य महाजनांचा. बहुसंख्य नागरिक महाजन आहेत. त्यांच्या बाजूने एक पुरोहित देवकार्य करत असतो. परंतु पाच जणांचा जो मानकऱ्यांचा गट आहे, ते स्वतःच देवकार्य करतात. हे असेच सुरू असताना काल रात्री मंदिराच्या गर्भकुडीला टाळे ठोकल्यामुळे वातावरण तापले.

पुन्हा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता

याच मंदिर परिसरात मागच्या महिन्यात एका महिलेचा विनयभंग होण्याची घटना - घडली होती. त्या महिलेने मांद्रे पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी यासंदर्भात चौकशी करून पाच जणांवर गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. एकंदरच या मंदिरात वेगवेगळ्या कारणांनी वाद असल्यामुळे केव्हाही पुन्हा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

उत्तर गोव्यातील घरफोड्यांच्या पर्दाफाश, अट्टल चोरासह फर्स्ट ईयरच्या विद्यार्थ्याला अटक; राज्यातील ठळक बातम्या

शव झेवियर यांचेच हे सिद्ध व्हायला नको का? एवढा राग कशासाठी? सुभाष वेलिंगकर DNA चाचणीवर ठाम

Ashwem News: अखेर वाद आटोक्यात!! दोन्ही गटांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची ४ ऑक्टोबर रोजी पुन्हा बैठक

Goa Politics: भाजपचा डिएनए गोंधळला की ते 'आरएसएस'च्या कुबड्या वापरतात; काँग्रेसची वेर्णेकरांवर टीका

Navratri in Goa: गोव्यात नवरात्रौत्सवाची दणक्यात सुरुवात; विविध कार्यक्रमांचे आयोजन

SCROLL FOR NEXT