पणजी: दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा आज (रविवारी) 49 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने देशभरातील मान्यवर नेत्यांनी सावंत यांना शुभेच्छा देत दीर्घायुष्य आणि राज्याच्या विकासात भरीव योगदान देण्यासाठी अभिष्टचिंतन व्यक्त केले.
आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावंत यांना दूरध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पुढील राजकीय वाटचालीस यश लाभो, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा, भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, पियुष गोएल, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भूपेंद्रसिंग यादव, रामदास आठवले, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मुक्तार अभास नक्वी, मनसुख मांडवीया, ज्योतीआदित्यराज शिंदे, जी. किशन रेड्डी, अनुराग ठाकूर, भागवत कराड, नरेंद्रसिंग तोमर, नारायण राणे, प्रल्हाद जोशी, रावसाहेब दानवे, दर्शना जर्दोश, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, हिमाचल प्रदेशचे राजेंद्र आर्लेकर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, सी. टी. रवी, डॉ. एल. मुरुगन, धर्मेंद्र प्रधान, अर्जुन मुंडा, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी, आसामचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराव भोमई आदींनी शुभेच्छा दिल्या.
ई-मेलवरही वर्षाव
मुख्यमंत्री सावंत दिवसभरात व्यस्त कामकाजामुळे गोव्यातील जनतेसाठी उपलब्ध राहू शकले नाहीत. त्यांनी ई-मेलवरून शुभेच्छा देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ई-मेलवर हजारो शुभेच्छा आल्या, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.