Mopa Airport News Dainik Gomantak
गोवा

पाच झाडे लावली असतील तरी दाखवा; मोपा पंचक्रोशी जनसंघटनेचे आव्हान

‘नागरी उड्डाण’चे अधिकारी खोटारडे

दैनिक गोमन्तक

मोरजी : नागरी उड्डाण खात्याचे संचालक ठामपणे सांगत आहेत, की आम्ही सर्व उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटीनुसार 5 लाख झाडे लावली. पण हा त्यांचा खोटारडेपणा असून आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे 5 झाडेही त्यांनी लावलेली नाहीत. लावलीच असतील तर संघटनेला आणि पेडणेतील पत्रकारांना सोबत घेऊन ती दाखवावीत, असे आव्हान मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित जनसंघटनेचे भास्कर नारूलकर व इतरांनी नागरी उड्डाणच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.

नागरी उड्डाण खात्याचे संचालक जी माहिती संबंधित खात्यांना व मुख्यमंत्र्यांना देत आहेत, ती माहिती पूर्णपणे खोटी असून आमचा त्यांच्यावर आता अजिबात विश्वास राहिलेला नाही.

ते अधिकारी स्वतः सरकारी अधिकारी आहेतच पण ते विमानतळ बांधणाऱ्या कंपनीचे संचालकही आहेत. तसेच मोपा प्रकल्प विकास प्राधिकरणचे सदस्य आहेत. तसेच या मोपा विमानतळ प्रकल्पात पन्नास टक्के भागीदार असल्याने ते मोपा विमानतळासंबंधित सर्व माहिती लोकांपासून तसेच संबंधित अधिकाऱ्यांपासून, सरकारपासून लपवत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे तसेच पेडणेच्या आमदारांना या अधिकाऱ्यांसोबत फक्त फोटो न घेता लोकांना घेऊन तसेच नागरी उड्डाण खात्याच्या संचालकांना घेऊन विमानतळ बांधणाऱ्या कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन बैठक बोलावून लोकांच्या समस्या तसेच शंका दूर कराव्यात, अशी मागणी मोपा पीडित जनसंघटनेचे भास्कर नारूलकर यांनी केली आहे.

पेडनणेचे आमदार प्रवीण आर्लेकर मोपा विमानतळावर जाऊन अधिकाऱ्यांसोबत फोटो काढत आहेत. त्यांनी फक्त फोटो काढू नयेत, तर पंचक्रोशीतील पीडितांच्या भवितव्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करावी.आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन लोकांना मुख्यमंत्र्यांच्या विधानाबद्दल 500 नोकऱ्यांच्या यादीसोबत माहिती द्यावी. ज्याची आज खूप मोठी गरज आहे. अन्यथा लोकांनी जी बाबू आजगावकरांची अवस्था केली, तीच यांची करावी लागेल. 7 दिवसात यादी न जाहीर केल्यास बाबूंसारखे आर्लेकरही बॅग आणायला मोपा विमानतळावर गेले होते, हे पंचक्रोशी पीडित जन संघटना लोकांना पटवून देईल,असा इशारा भरत बागकर यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT