Japanese Tourist Looted In Goa
Japanese Tourist Looted In Goa Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक! जपानी पर्यटकाला गोव्यात मारहाण करून 9 लाखांना लुबाडले; ट्विटरवरून शेअर केले लुटारूंचे फोटो

Akshay Nirmale

Japanese Tourist Looted In Goa: जपानी दुतावासाने त्यांच्या पर्यटकांना गोव्यात पर्यटन करणार असाल तर सावध राहा, असा इशारा देऊन आठवडा होत नाही तोपर्यंत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जपानी पर्यटकाला काही लोकांनी मिळून सुमारे 9 लाख 23 जार रूपयांना लुबाडल्याचे समोर आले आहे.

ही घटना डिसेंबरिमध्ये घडली असून संबंधित पर्यटकाने ट्विटवर पोस्टमधून त्याची कैफियत मांडली आहे. विशेष म्हणजे, त्याची फसवणूक करणाऱ्यांचे फोटोही संबंधित पर्यटकाने ट्विटरवरून शेअर केले आहेत.

@tv_tatsuki या ट्विटर हँडलवरून हे ट्विट केले गेले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यात म्हटले आहे की, 29 डिसेंबर रोजी तो गोव्यात आला होता. तेव्हा काही जणांच्या समुहाने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याला बंदी केले. मारहाणही केली.

त्याला धमकावून त्याच्याकडील क्रेडिट कार्डचा पिन नंबर घेतला. त्याचा सुमारे 1.5 दशलक्ष येनचा मुद्देमाल लुटण्यात आला. यात रोख 180000 येन, आयफोन 11, जपान क्रेडिट ब्युरोच्या कार्डवरून 367740 येन, व्हिसा कार्डवरून 870345 येन, सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन 85000 येन लुटले. भारतीय रूपयांत त्याची एकूण किंमत 9 लाख 23 हजार रूपये इतकी होते.

माझे पैसे परत मिळावेत यासाठी मला पाठिंबा द्या, अशी विनंतीही त्याने केली आहे. या जपानी पर्यटकाने ज्या व्यक्तींनी त्याला लुटले त्या संशयितांचे फोटोही शेअर केले आहेत.

दरम्यान, याबाबत उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन संबंधित जपानी व्यक्तीला मेल पाठवण्यास सांगितले आहे तसेच संपर्क क्रमांकही मागितला आहे. याबाबत चौकशी करू, असेही ते म्हटले आहेत.

वाल्सन यांच्या ट्विटला प्रत्युत्तर देताना जपानी नागरिकाने, दीड महिन्यापासून पोलिसांना ई-मेल पाठवत असल्याचे म्हटले आहे. अनेकदा सांगुनही एफआयआर नोंदवली नाही, असेही त्याने म्हटले आहे.

जपानी दुतावासाने काही दिवसांपुर्वी दिले होते निर्देश

दरम्यान, मुंबईतील जपानी वाणिज्य दूतावासाने भारतात येणाऱ्या जपानी पर्यटकांसाठी 7 फेब्रुवारी रोजी अॅडव्हायझरी जारी केली होती. त्यात उत्त गोव्यातील अंजुना बीचवर जाणार असल्यास सावध राहा, असे म्हटले होते.

पर्यटकांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभुमीवर आणि पर्यटकांच्या फसवणुकीच्या पार्श्वभुमीवर हे दिशानिर्देश जारी केले होते.

त्यात म्हटले होते की, अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका, अंजुना बीच परिसरात अनेक लोक संगनमताने पर्यटकांची लूट करतात. पर्यटकांवर अमली पदार्थ तस्करीचा आरोप ठेऊन त्यांना कारवाईची भीती दाखवली जाते.

पर्यटकांकडून रोकड, स्मार्ट फोन, क्रेडिट कार्ड लुटली जातात. त्यामुळे अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे टाळा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News : शेकडाे मजुरांची पडताळणी; खून प्रकरणानंतर मोपात सतर्कता

Margao Accident : कणकवली येथे कार उलटून मडगावातील सात प्रवासी जखमी

Sasashti News : सासष्टी तालुका काँग्रेेस पक्षाचा अभेद्य गड ढासळला

Panaji News : बारावीनंतर दहावीतही मुलींचा टक्का वाढला; शाळांच्या हलगर्जीपणामुळे ९७ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

SCROLL FOR NEXT