Naked Man Dainik Gomantak
गोवा

Ponda College: कॉलेज कॅम्पसमध्ये नग्न अवस्थेत चालवत होता बाईक, विद्यार्थ्यांनी दिला चोप; फोंड्यातील धक्कादायक घटना

Shocking Incident in Ponda: येथील कॉलेज कॅम्पसमध्ये एक व्यक्ती भरदिवसा नग्न अवस्थेत दुचाकीवरुन फिरताना दिसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Manish Jadhav

Shocking Incident in Ponda: फोंड्यातील एका अत्यंत विचित्र आणि धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. येथील कॉलेज कॅम्पसमध्ये एक व्यक्ती भरदिवसा नग्न अवस्थेत दुचाकीवरुन फिरताना दिसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही घटना पाहून विद्यार्थी आणि उपस्थित नागरिक स्तब्ध झाले असून कॅम्पसच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

कॉलेजमध्ये नियमित कामकाज सुरु असताना ही व्यक्ती अचानक कॅम्पसमध्ये आल्याने एकच खळबळ उडाली. तो पूर्णपणे नग्न अवस्थेत दुचाकी चालवत होता, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही क्षण तर कोणाला काय बोलावे कळलेच नाही. त्याचवेळी, काही विद्यार्थ्यांनी लगेचच आपल्या मोबाईल फोनमध्ये या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे ही घटना उजेडात आली. एवढचं नाहीतर विद्यार्थ्यांनी (Students) त्याला चांगलाच चोप दिला.

सोशल मीडियावर व्हिडिओची चर्चा

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. व्हॉट्सॲप आणि फेसबुकसारख्या माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केवळ फोंडा शहरातच नव्हे, तर संपूर्ण गोव्यात या घटनेची चर्चा सुरु झाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती हा परिसरातीलच रहिवासी असल्याची शक्यता आहे. त्याने असे कृत्य कोणत्या कारणाने केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना गंभीर असून सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करणे कायद्याचे उल्लंघन आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. एवढचं नाहीतर अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणीही नागरिक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket: निवृत्तीच्या वयात पदार्पण! 38 वर्षीय आफ्रिदीची कसोटी क्रिकेटमध्ये एन्ट्री

'पुलिसांक काय Value ना?", नरकासुर मिरवणुकीत आवाज वाढवला, मंडळाने घातली हुज्जत; पोलिसांनी घेतली कडक ऍक्शन

Narkasur in Goa: नरकासुर स्पर्धेत राडा! काणकोणात मिरवणुकीच्या रस्त्यावरून दोन गट भिडले; जोरदार हाणामारी

Viral Video: 'देसी' आयडिया जिंदाबाद! सुरी मिळाली नाही म्हणून पठ्ठ्यानं कात्रीनं कापलं सफरचंद, व्हिडिओ पाहून म्हणाल 'व्वा!'

Goa Politics: "हे 33 नरकासुर गोवा जाळतील", श्रीकृष्ण विजयोत्सवात विरोधी पक्षांची वज्रमुठ; सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान?

SCROLL FOR NEXT