Aadesh Bandekar Dainik Gomantak
गोवा

गोव्यात शिवसेना दिलेला प्रत्येक शब्द पाळणार : आदेश बांदेकर

वास्को आणि कुठ्ठाळी मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांचा आदेश बांदेकरांकडून प्रचार

दैनिक गोमन्तक

वास्को : शिवसेनेची भावना एका कुटुंबाची आहे. प्रत्येक शिवसैनिक कायम दुसऱ्यासाठी धावून जाणारे, दुसऱ्याच्या मदतीसाठी धावणारे आहे असे सगळे संस्कार शिवसैनिकांवर आहेत. आपण जे बोलतो ते करून दाखवतो हीच वृत्ती शिवसैनिकांची असून जे जे शब्द आमच्या उमेदवाराने मतदारांना दिले आहेत ते ते शंभर टक्के करून दाखवणार आहोत, असे प्रतिपादन 'होम मिनिस्टर' फेम तथा शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी केले. (Aadesh Bandekar News Updates)

वास्को (Vasco) आणि कुठ्ठाळी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार मारुती शिरगावकर तसेच भक्ती खडपकर यांच्या प्रचारार्थ बांदेकर वास्कोत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वास्कोतील शिवसेना कार्यालयात त्यांनी उपस्थित शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांनाही संबोधित केले.

अत्यंत आक्रमक असे नेतृत्व आणि प्रगतशील विचारधारा असणारे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे अहोरात्र झटत आहे. यात युवकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अधिक भर ते देत आहे. जे बोलून दाखवतो ते आदित्य ठाकरे करून दाखवतात. त्यामुळे येणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections) शिवसेनेचा झेंडा फडकावून त्यांच्या नेतृत्वाला बळ गोमंतकीय जनतेने द्यावे, असे आवाहन आदेश बांदेकर यांनी मतदारांना केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

SCROLL FOR NEXT