Shivsena Vs RG Dainik Gomantak
गोवा

Shivsena Vs RG: शिवसेनेच्या अडसूळांचा दावा अन् परब म्हणाले 'लायकी ना तुजी', RG लाही मिळाले मोफत सल्ले

शिवसेना नेते अडसूळ यांच्या विधानामुळे गोव्यातील राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.

Pramod Yadav

'रिव्हॉल्युशनरी गोवन्स (RG) या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मनोज परब यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत, ते अधुनमधून वर्षा बंगल्यावर येत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही ते भेटले आहेत. तसेच, गोव्यातील प्रमुख तीन-चार नेते आमच्या संपर्कात आहेत.' असा दावा शिवसेना (शिंदे गट) नेते माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी गोव्यात केला.

अडसूळ यांच्या विधानामुळे गोव्यातील राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. तर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भविष्यात गोव्यात काय हालचाली करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आनंदराव अडसूळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर गोव्यातील राजकीय पक्षांनी मनोज परब यांनी त्यांचा पक्ष रिव्हॉल्युशनरी गोवन्सवर निशाना साधला आहे.

गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस नितीन पाटकर यांनी मनोज परब यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अडसूळ यांनी मनोज परब यांचे जवळ संबंध असल्याचे त्यांनी सांगितले, यात काही आश्चर्य नाही. पण, रिव्हॉल्युशनरी गोवन्स हा भाजपची बी टीम असल्याचे सिद्ध झाले आहे. काँग्रेसची मते फोडण्याचा डाव आरजीचा आहे. असे नितीन पाटकर म्हणाले.

गोवा आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असलेले अमित पालेकर यांनी देखील आज पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळाल्याबद्दल पत्रकार परिषद घेतली. यावेळी पालेकर यांनी परब आणि अडसूळ यांच्यावर निशाना साधला. रिव्हॉल्युशनरी गोवन्सने शिंदे गटाच्या शिवसेनेत विलीन व्हावे, कारण ते एकाच माळेचे मणी आहेत. असे पालेकर म्हणाले.

दरम्यान, या सगळ्या प्रकणावर रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या वतीने देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे. पक्षाचे नेते तुकाराम (मनोज) परब यांनी याबाबत पक्षाची भूमिका मांडली आहे. 'आनंदराव अडसूळ तुमची लायकी नाही मनोज परब यांच्या सोबत बसण्याची. रिव्हॉल्युशनरी गोवन्स तुमच्यासारख्या रिकाम्या नेत्यासोबत पत्रकार परिषद घ्यायला मोकळी नाही. ना शिवसेने सोबत जाण्यात आम्हाला रस आहे.' अशा शब्दात तुकाराम (मनोज) परब यांनी यांचे दावे धुकावून लावत बोचरी टीका केली.

आरजीचा महाराष्ट्रात अभ्यास दौरा

शिवसेना आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्सचा सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान, रिव्हॉल्युशनरीचे नेते आणि पदाधिकारी सध्या महाराष्ट्रात अभ्यास दौऱ्यावर आहेत. मनोज परब, आमदार वीरेश बोरकर आणि इतर पदाधिकारी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहेत. नेते नगरमधील हिवरे बाजारला येथे पद्मश्री पोपटराव पवार यांची भेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT