Shiroda  Dainik Gomantak
गोवा

Shiroda News : शिरोडा शिवनाथ संस्थानचा जत्रोत्सव 26 डिसेंबरपासून

Shiroda News : गुरुवार २८ रोजी रात्री ८.३० वा. श्रींच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Shiroda News : शिरोडा, शिवनाथी शिरोडा येथील ग्रामदैवत श्री शिवनाथ संस्थानातील वार्षिक जत्रौत्सव मंगळवार, २६ ते रविवार ३१ डिसेंबर च्या दरम्यान विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी साजरा होणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष म्हाडू उर्फ राजू प्रभुगावकर यांनी दिली.

यानिमित्त मंगळवार २६ रोजी सकाळी श्री शिवनाथ व पंचिष्ट देवताना विधिपूर्वक अभिषेक पूजा व अन्य धार्मिक विधी सकाळी गवळणकाला सकाळी ९ वाजता पालखीतून मिरवणूक, लघुरुद्र व अन्य धार्मिक विधी दुपारी १ वाजता श्रींची महाआरती, व कै. मालती मधूकर शिरोडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रवीण शिरोडकर पुरस्कृत महाप्रसाद सर्व भाविकांना वाढला जाणार आहे.

सायंकाळी ७ वा. श्री मंडलेश्‍वर देवाचे श्री शिवनाथ मंदिरात आगमन, मुक्‍तद्वार, पुराणवाचन, भजन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. बुधवार २७ रोजी पहाटे, ५.३० वा. सांगोड, नौकाविहार रथोत्सव, दुपारी १२ वा. दिवजोत्सव होईल. रात्री ८ वा. प्रसाद वाटप होईल. गुरुवार २८ रोजी रात्री ८.३० वा. श्रींच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT