Shiv Sena Sanjay Raut Dainik Gomantak
गोवा

गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार, काँग्रेसलाही सोबत येण्याचं संजय राऊतांच आवाहन

जर वेगवेगळे लढलो तर भाजपला याचा नक्कीच फायदाच होणार; संजय राऊत

दैनिक गोमन्तक

राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी राज्यातील नेतृत्व निकराने प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपचा पराभव करण्यासाठी तृणमुलसह इतर राजकीय पक्षांनी मोट बांधली आहे. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोव्यात शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे, तसेच गोव्यात काँग्रेसलाही सोबत येण्याचं आवाहन यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.

दरम्यान, गोव्यात (Goa) भाजपचं सरकार बनणार नाही. आजपर्यंतचा भाजपचा तसा इतिहास राहिला आहे, मात्र जर वेगवेगळे लढलो तर भाजपला याचा नक्कीच फायदाच होणार, त्यामुळ काँग्रेसने सोबत यावं, यासाठी राहुल गांधींसोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याच देखील यावेळी ते बोलले. त्याचबरोबर एकत्र येण्यासाठी स्थानिक नेत्यांनी निर्णय घ्यावा असाही निर्वाणीचा सल्ला त्यांनी यावेळी नेत्यांना दिला आहे.

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या (Election) तारखांची घोषणा आज निवडणूक आयोगाने (Election Commission) केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात पार पडणार आहेत. तर पंजाब गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. 10 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:मंत्री माविनचे 'सांबा', 'कालिया' काय करतात हे त्यांना माहित नाही"

Viral News: तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

Mumbai Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

Kokedama: नारळाच्या काथ्यापासून विघटनशील, जपानी 'कोकेडामा' बनवणारी गोमंतकीय कलाकार 'लेखणी'

SCROLL FOR NEXT