Shiv Sena MP Sanjay Raut Dainik Gomantak
गोवा

गोव्यात राजकारण्यांना पक्षांतराचा रोग

जनतेला थांबवावी लागेल प्रथा, म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षांतरावर केली जोरदार टीका

दैनिक गोमन्तक

पणजी: एका पक्षाच्या उमेदवारीवर निवडून येऊन दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याचा गोव्यातील (Goa) राजकारण्यांना (Leaders) रोग लागला आहे. निर्लज्जपणे सत्तेसाठी व मंत्रिपदासाठी उडी मारण्याची प्रथा यावेळी जनतेला थांबववी लागणार आहे. हे थांबवण्याची योजना शिवसेनेकडे (ShivSena) आहे. दिल्ली व बंगालमधून आलेले पक्ष गोमंतकियांचे भाग्य बदलतील का हा मोठा प्रश्‍न आहे. जनतेच्या मनात जे असेल तेच होईल मात्र यावेळी कोणतीही आघाडी व युती न करता स्वबळावर निवडणूक लढवून सुशासन देण्याची शिवेसेनेची भूमिका आहे, असे स्पष्ट मत शिवसेना खासदार व गोवा प्रभारी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले.

खासदार संजय राऊत हे गेले दोन गोवा भेटीवर आहेत. आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, राज्यामध्ये यावेळी नेहमीपेक्षा अधिक धुरळा उडला आहे. राजकारण्यांची राष्ट्रीय उड्या मारण्याची मजल कोलकत्त्यापर्यंत गेली आहे. गोव्यामध्ये तृणमूलचा उदय झाला आहे व गोव्यासाठी नवी पहाट आहे असे भासविले जात असेल तर यापूर्वी गोव्यात कधी पहाट झाली नव्हती का? असा प्रश्‍न त्यांनी केला, अशी टीका त्यांनी केली.

गोव्यात निवडणुकीत युती व आघाडी करणे यावेळी टाळायचे व 22 ते 25 जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. गोव्याची अस्मिता व जनतेचा आवाज उठविण्यासाठी जनता शिवसेनेला विधानसभेत पाठविल. महाराष्‍ट्रात शिवसेनेचे सरकार आहे व लोकांना चांगले प्रशासन देत आहे ते गोव्यातील लोकांनी पाहिले आहे. मागील निवडणुकीत ज्या ठिकाणी शिवसेनेचा अधिक संबंध नाही तेथील तीन जागा विधानसभेसाठी आघाडी केलेल्या पक्षांनी दिल्या होत्या. त्यामुळे शिवेसेनला अधिक वावच नव्हता. मात्र शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे व पक्षाचे काम संघटन वाढवण्याचे आहे. आम्ही युती व आघाडी करत राहिल्याने पक्षाचा विस्तार होऊ शकला नाही. त्यामुळे आता या युती - आघाडीच्या पलिकडे जाऊन लढू. महाराष्ट्रात शिवसेनेची काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी युती असली तरी गोव्यात नेहमीच पक्षाची भूमिका वेगळी राहिलेली आहे. त्या युतीचा गोव्याशी काहीही संबंध नाही असे राऊत म्हणाले.

राज्यात युती - आघाडीचे यापूर्वी अनेक प्रयोग झाले मात्र त्यातून काय मिळाले? कोणालाच बहुमत मिळाले नाही. काँग्रेस बहुमताच्या जवळ असूनही त्यांचे आमदार फुटले व भाजपात गेले. भाजपने आमदार फोडण्याचे काम करून स्थिर सरकार स्थापन केले. शिवसेना यावेळी विरोधी पक्षात बसली तरी चालेल, विरोधात राहूनही जनतेचे प्रश्‍न सोडवता येतात हे शिवसेने महाराष्ट्रात यापूर्वी दाखवून दिले आहे. गोव्यातील बहुतेक राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने भाजपचा विजयाचा मार्ग सुकूर होत आहे असे वाटत नाही का असा प्रश्‍न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, त्याचा फायदा भाजपला होणार नाही. उलट मागील निवडणुकीत भाजपच्या जागा घटल्या होत्या.

शिवसेना तीन दशके राज्यात निवडणूक लढवत आहे व प्रत्येकवेळी भूमिका बदलत आली आहे. मागील निवडणुकीत मराठी भाषेसाठी लढा देणाऱ्या पक्षाबरोबर युती केली होती असा प्रश्‍न विचारला असता खासदार संजय राऊत म्हणाले की, मराठी व कोकणी या भाषेच्या बहिणी आहेत. सरकारने या दोन्ही भाषांना दर्जा दिला आहे. बहुसंख्य लोक हे मराठी टिव्ही चॅनेलच पाहतात. गोव्याच्या भूमीत मराठी रुजली व ती वाढत राहिली. त्यामुळे मराठी व कोकणी असा शिवसेनेने कधीच मतभेद केलेला नाही असे स्पष्टीकरण त्यांनी केले.

अगोदर शिवसेनेची भाजपबरोबर युती होती तेव्हा ते काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत होते, आता भाजपवर टीका करत आहे या प्रश्‍नाला उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले, महाराष्‍ट्रातील 25 वर्षाची युती शिवसेनेने नव्हे तर भाजपने तोडली. त्यामुळे शिवसेनेने यावेळी महाराष्ट्रात त्यांचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सरकारने कसिनो मांडवीतून हटवण्याऐवजी त्याना वर्षभर मुदत वाढवून दिली. यामुळे सरकारला महसूल मिळेल मात्र टेबलाखालून किती महसूल मिळतोय याचाही हिशोब या निवडणुकीत मागील. ‘सरकार तुमच्या दारी’ अभियान सुरू केले आणि त्यांचे अर्धे नेते कोरोना बाधित झाले आहेत. नोकऱ्यांचा लिलाव सुरू असल्याची टीका राऊत यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT