Shivsena In Goa Dainik Gomantak
गोवा

Shivsena In Goa: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची गोव्यात एन्ट्री; शनिवारी राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन

Maharashtra DCM Eknath Shinde In Goa: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने गोव्यात आपला विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sameer Amunekar

पणजी: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने गोव्यात आपला विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार, ८ मार्च २०२५ रोजी, गोव्यातील नानोडा, डिचोली येथील एका फार्म हाऊसवर राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

या मेळाव्याच्या आयोजनासाठी आज (६ मार्च)ठाणे, मुंबई येथे एक बैठक पार पडली, ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. गोव्यातील शिवसेना मेळावा पक्षाच्या विस्तार धोरणाचा एक भाग आहे.

या मेळाव्यात गोव्यातील शिवसेना कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक नागरिक सहभागी होतील. या मेळाव्यात एकनाथ शिंदे आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहून गोव्यात पक्षाच्या आगामी योजना आणि धोरणांवर चर्चा करतील.

गोवा हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं राज्य आहे. एकनाथ शिंदेंनी गोव्यात आपल्या पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केलं आहे.

या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना पक्ष स्थानिक समस्यांवर चर्चा करून त्यांचं निराकरण करण्यासाठी पुढाकार घेण्याची अपेक्षा आहे.

गोव्यात आधीच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कार्यरत आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची एन्ट्री झाल्यामुळं गोव्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो.

आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं गोव्यात प्रवेश केल्यास इथलं राजकीय गणित काही प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक पातळीवर नवं समीकरण तयार होऊ शकतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT