Shiv Jayanti 2024 Dainik Gomantak
गोवा

Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम; मडगाव पालिकेचा निर्णय

Shiv Jayanti 2024 : सिद्धांत गडेकर आयोजन समिती अध्यक्षपदी शिवाय येत्या चार ते पाच दिवसात डॉ. लोहिया मैदानावर वेशभूषा स्पर्धा घेण्याचाही निर्णय घेण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Shiv Jayanti 2024 :

सासष्टी, मडगाव नगरपालिका कौन्सिलने आज खास बैठक बोलावून ३५०वी शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी नगरसेवक सिद्धांत गडेकर यांची शिवजयंती आयोजन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. रवींद्र (राजू) नाईक व दामोदर वरक हे या समितीचे इतर सदस्य असून नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.

शिव साम्राज्य तर्फे शिवजयंती निमित्त जी मिरवणूक काढली जाईल ती मडगाव नगरपालिकेतर्फे पुरस्कृत केली जाईल. शिवाय येत्या चार ते पाच दिवसात डॉ. लोहिया मैदानावर वेशभूषा स्पर्धा घेण्याचाही निर्णय घेण्यात आला.

यंदा पर्यटन खात्याने ३५० वी शिवजयंती असल्याने ती पाच प्रमुख शहरात साजरी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी खात्याने पाच नगरपालिकांना प्रत्येकी ५ लाख रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष शिरोडकर यांनी दिली. शिव साम्राज्यच्या प्रमुख समितीलाच पालिकेतर्फे मदत केली जाईल, असेही नगराध्यक्ष म्हणाले.

आंतर नगरपालिका क्रिकेट स्पर्धा शनिवारी

मडगाव नगरपालिकेने आंतर नगरपालिका क्रिकेट स्पर्धा शनिवार २४ फेब्रुवारी रोजी फातोर्डा मैदानावर आयोजित केली असल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी बैठकीत दिली.

या स्पर्धेत सध्या १० पालिका संघांनी आपला सहभाग निश्र्चित केला असून १२ ते १३ संघ सहभागी होतील, असा विश्र्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला.

पुरस्कृत कुणाला?

बैठकीच्या सुरवातीलाच नगरसेवक सदानंद नाईक यांनी आजच शिवजयंती व आजच समिती स्थापन करण्यामागचा हेतू काय, अशी विचारणा केली. राजू नाईक म्हणाले की, जर पर्यटन खात्याकडून पाच लाख रुपये आले असतील तर पालिकेतर्फेच शिवजयंती साजरी करणे उचित ठरेल.

शिवाय शिव साम्राज्य संघटनेत १६ गट आहेत. त्यातील कुठल्या गटाला पालिका पुरस्कृत करेल, हा प्रश्र्नही त्यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: कामुर्लीच्या उपसरपंच्यांना मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

IFFI 2024: मराठी कलाकारांची 'शोलेला' मानवंदना! अभिनेत्री प्राजक्ता दातारने म्हणला Iconic Dialogue; ‘बसंती, इन कुत्तों के सामने..'

Pooja Naik Case: '..भाजप नेत्यांना केलेल्या कॉलचा संदर्भ सापडेल'; Cash For Job प्रकरणी पालेकर यांनी केली सीडीआर रिपोर्टची मागणी

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

SCROLL FOR NEXT