Crime News Dainik Gomantak
गोवा

Quepem Crime: 'तो' हल्‍ला प्रेम प्रकरणातून! केपे पोलिसांचा प्राथमिक अंदाज; संशयिताविरुद्ध खुनाच्या प्रयत्‍नाचा गुन्हा नोंद

Shirwai Quepem: केपे पाेलिसांनी कालपासून संशयिताचा शोध घेणे सुरू केले असले, तरी हा संशयित अजुनही फरार आहे. केपे पोलिस काल रात्री बोर्डा-मडगाव येथील त्‍याच्‍या घरी जाऊन आले.

Sameer Panditrao

मडगाव: शिरवई-केपे येथे काल दुपारी एका युवतीवर जो सुरीहल्‍ला झाला त्‍या प्रकरणात केपे पोलिसांनी संशयित अनंत कदम याच्‍या विरोधात खुनाचा -केल्‍याचा गुन्‍हा नोंद केला आहे.

हा हल्‍ला प्रेम प्रकरणातून झाल्‍याचा प्राथमिक अंदाज केपे पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे. दरम्‍यान, या हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍या युवतीवर सध्‍या गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्‍पितळात उपचार सुरू आहेत.

केपे पाेलिसांनी कालपासून संशयिताचा शोध घेणे सुरू केले असले, तरी हा संशयित अजुनही फरार आहे. केपे पोलिस काल रात्री बोर्डा-मडगाव येथील त्‍याच्‍या घरी जाऊन आले. मात्र, तो घरी सापडला नाही. त्‍याचा फोनही बंद असल्‍याने त्‍याचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही.

या प्रकरणात जखमी झालेली युवती आपल्‍या मैत्रिणीबरोबर शिरवई येथे एका फार्मवर आली होती. तिथे तिचा प्रियकर असलेला संशयितही आला होता. तिथे त्‍यांच्‍यात अकस्‍मात वाद निर्माण झाल्याने ती युवती फार्मवरुन निघाली असता, संशयिताने तिचा कारमधून पाठलाग करत वाटेत गाठले व तिच्‍या पोटात सुरा खुपसला होता. त्‍यात ती गंभीर जखमी झाल्‍यानंतर संशयिताने तिला आपल्‍या गाडीने मडगावच्‍या जिल्‍हा इस्‍पितळात आणून दाखल केले होते. त्‍यानंतर तो तिला तिथेच सोडून पळून गेला होता.

युवतीची प्रकृती चिंताजनक

हा संशयित गोव्‍याबाहेर पळून जाण्‍याची शक्‍यता असल्‍याने केपे पोलिसांचे एक पथक त्‍याच्‍या शोधार्थ गोव्याबाहेर गेले आहेत. सुरीहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवतीची प्रकृती अद्यापही स्‍थिर न झाल्‍याने तिची जबानी अजून नोंदवून घेतलेली नाही. काल रात्री गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तिच्‍यावर शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली, पण अजूनही ती जबानी देण्‍याच्‍या स्‍थितीत नाही, असे डाॅक्‍टरांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT