Shiroda Dainik Gomantak
गोवा

Shiroda News : तलाव स्वच्छतेवर भर द्या : शिरोडकर

Shiroda News : शिरोड्यात तलावांची दुरुस्ती सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Shiroda News : शिरोडा, गावातील पवित्र मंदिरासमोरील तलाव एकेकाळी गावातील नागरिकांचे जीवन स्त्रोत होते. या पाण्याचा उपयोग नित्यवापराबरोबरच शेती बागायतीसाठीही होतो.

म्हणून तलावांचे बांधकाम आणि सौंदर्यीकरण केल्यावर या तलावाची स्वच्छता आणि निगा राखण्यावर भर द्या, असे प्रतिपादन जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

वाजे-शिरोडा येथील श्री मंडलेश्‍वर मंदिरासमोर असलेल्या तलावाची दुरुस्ती आणि सौंदर्यीकरण सुमारे ३२ लाख रु. खर्चून केली जात आहे. या कामाचा शुभारंभ ११ रोजी झाला. यावेळी मंत्री शिरोडकर बोलत होते.

याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष म्हाडू ऊर्फ राजू प्रभूगावकर, जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत, सरपंच पल्लवी शिरोडकर, पंचायत सदस्य सुहास नाईक, शिरोडा भाजपमंडळ अध्यक्ष सूरज नाईक, शिवानंद नाईक,

आनंद खांडेपारकर, देवालयाचे अर्चक महेश परांजपे, बबन शिरोडकर, चंद्रकांत हेदे, अभियंते सचिन शिरोडकर, संदेश पैंगीणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरोडकर यांच्या हस्ते भूमीपूजन करून व श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सरपंच पल्लवी शिरोडकर यांनी स्वागत केले. तर पंचसदस्य सुहास नाईक यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT