Lairai Jatra Shirgao Dainik Gomantak
गोवा

Lairai Jatra: 'लईराई' जत्रेची जोरदार तयारी, 21 रोजी जत्रा; होमकुंडासाठी लाकडांची जमवाजमव

Lairai Jatra Shirgao: लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लईराई देवीच्या जत्रेला आता अवघेच दिवस असल्याने सध्या शिरगावात हळूहळू उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री लईराई देवीच्या जत्रेला आता अवघेच दिवस असल्याने सध्या शिरगावात हळूहळू उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. शिरगावात सध्या जत्रेची जोरात तयारी सुरु झाली असून, होमकुंडासाठी लागणारी लाकडेही उपलब्ध करण्यात आली आहेत. दुसऱ्या बाजूने नवस बोलल्याप्रमाणे भाविकही आता होमकुंडासाठी लाकडाची भारे अर्पण करीत येत असल्याचे दिसून येत आहेत.

देवस्थान समितीतर्फे होमकुंडासाठी लाकडांची व्यवस्था करण्यात येत असते. परंपरेप्रमाणे यंदाही मये येथील कावळेरान येथून ही लाकडे उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती मिळाली आहे. गेल्यावर्षी झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर यंदा जत्रेवर कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. जत्रा निर्विघ्नपणे साजरी व्हावी यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि देवस्थान समिती कामाला लागली आहे.

देश-विदेशात प्रसिद्धीस पावलेल्या शिरगावच्या श्री लईराई देवीची जत्रा यंदा येत्या २१ रोजी साजरी होणार आहे. तर २२ ते २५ एप्रिलपर्यंत चार दिवस पारंपरिक कौलोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शिरगावची लईराई देवी म्हणजे भक्तांचे श्रद्धास्थान. भक्तांच्या हाकेला पावणारी देवी. अशी या देवीची ख्याती आहे.

गोमंतकातील एक मोठी जत्रा म्हणून ओळखण्यात येणारी लईराई देवीची जत्रा अन्य राज्यातही प्रसिद्ध आहे. या देवीचे गोव्यासह अन्य शेजारील राज्यात मिळून हजारो धोंड भक्तगण आहेत. जत्रोत्सवाच्या काळात लाखो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी शिरगावात येतात. गेल्यावर्षीच्या दुर्घटनेमुळे यंदा मात्र जत्रेच्या दिवशी भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Labh Drishti Yog 2026: मंगळ-गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी योग'! 3 राशींचे लोक होणार मालामाल; नोकरीत मिळणार मोठी पगारवाढ

Viral Post: 'कंजूष' कंपनीची करामत!पगारवाढीच्या बदल्यात कर्मचाऱ्यांना दिलं 1 लीटर पाणी अन् बिस्किट! पोस्ट होतेय व्हायरल

Bicholim Bus Stand: डिचोली बसस्थानकात बेशिस्तपणा; वाहतूक कोंडी, अपघाताच्या धोक्याने प्रवासी त्रस्त

Goa Politics: आमदार वीरेश बोरकरने मनोजला दिले आव्हान! संस्थापक सदस्य, समित्य‍ांशी चर्चेअंतीच पुढील निर्णय

US Israel Iran Conflict: इराण युद्धाच्या रणनीतीवरुन ट्रम्प-नेतान्याहू यांच्यात फोनवर कडाक्याचं भांडण; अमेरिकेच्या भूमिकेमुळे इस्रायल नाराज VIDEO

SCROLL FOR NEXT