Lairai Devi jatra Dainik Gomantak
गोवा

Lairai Devi jatra 2024 : ‘लईराई’चा कौलोत्सव अभूतपूर्व उत्साहात; शिरगावात भक्तिमय वातावरण

Lairai Devi jatra 2024 : ‘लईराई’चा कौलोत्सव अभूतपूर्व उत्साहात; शिरगावात भक्तिमय वातावरण

गोमन्तक डिजिटल टीम

Lairai Devi jatra 2024 : ‘

डिचोली, श्री लईराई देवीचा जयघोष आणि हजारो भाविकांच्या साक्षीने शिरगाव येथील श्री लईराई देवीचा कौलोत्सव अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. एकाबाजूने पावसाचे सावट असतानादेखील आज (गुरुवारी) कौलोत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती.

सायंकाळी पावसाचा शिडकावाही झाला. मात्र, त्याचा कौलोत्सव आणि भाविकांवर मोठासा परिणाम झाला नाही.

देवीचा कौल घेण्यासाठी गोव्यासह शेजारील राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक शिरगावात आले होते. त्यामुळे आज शिरगाव परिसर भक्तीरसाने न्हावून गेल्याची अनुभूती येत होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

रविवारी श्री लईराई देवीचा होमकुंड जत्रोत्सव साजरा झाल्यानंतर गेल्या सोमवारपासून शिरगावात देवी लईराईच्या कौलोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला होता. चार दिवस गावातील प्रमुख वाड्यावरील घरोघरी देवीचे आगमन होऊन देवीने भक्तांना भेट आणि कौल दिला. देवीचा कौल घेण्यासाठी गावातील भाविकांसह चारही दिवस विविध भागातील भाविकांनी गर्दी केली होती.

भाविक देवीकडून कौल मिळवण्यासाठी प्रत्येक घरोघरी गर्दी करीत होते. चारही दिवस गावात मंगलमय वातावरणासह उत्साह संचारला होता. आज (गुरुवारी) कौलोत्सवाच्या अंतिम दिवशी तर शिरगावात भाविकांचा जनसागर लोटला होता.

वडाचावाडा येथील घरोघरी भेट देऊन भक्तांना कौल दिल्यानंतर रात्री उशिरा जयघोष आणि वाजतगाजत प्रचंड जल्लोषात देवीचे मंदिरात आगमन झाले,आणि चार दिवस चाललेल्या कौलोत्सवाची सांगता झाली.

फेरीतील दुकाने हटविली

जत्रोत्सवानिमित्त यंदाही शिरगावात मोठी फेरी भरली होती. खाजे, रेडिमेड कपडे, हॉटेल, खेळणी आदी मिळून दोनशेहून अधिक दुकाने थाटण्यात आली होती. कौलोत्सव साजरा झाल्यानंतर आता बहूतेक दुकाने हटविण्यात आली आहेत. जत्रोत्सव आणि कौलोत्सवाला भाविकांचा जनसागर लोटल्याने व्यावसायिकांचा धंदाही तेजीत झाल्याचा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा! 5 वर्षांत 4,657 अपघातांत 1,011 जणांचा मृत्यू; सर्वाधिक बळी 45 ते 60 वयोगटातील

पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर काय? विरोधक आंदोलनाची धार कायम ठेवणार की सरकार नव्या निर्णयांनी समीकरणं बदलणार?

Maharashtra Crime: 'आमच्या मृत्यूला कोणालाही दोषी धरु नका'! आर्थिक विवंचनेतून पती, पत्नी आणि 19 वर्षांच्या मुलीनं संपवलं जीवन; महाराष्ट्र हादरला

Weather Update: राज्‍यात पुन्‍हा 'मुसळधार' पाऊस, आतापर्यंत 55 इंचांपेक्षा अधिक पावसाची नोंद

America Iran Conflict: 'अमेरिकेची हवा निघाली'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'नो वॉर'च्या घोषणेवर इराणचा तगडा पलटवार VIDEO

SCROLL FOR NEXT