Shigmo Festival Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmo Festival : शिमगोत्सव मिरवणुकीला यंदाही वेळेचे बंधन कायम

शिमगोत्सवात आकर्षण असणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीवर यंदाही वेळेचे बंधन कायम राहिले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Shigmo Festiva 2023: शिमगोत्सवात आकर्षण असणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीवर यंदाही वेळेचे बंधन कायम राहिले आहे. चित्ररथाची मिरवणूक रात्री 10 पर्यंत संपवावी, अशी अट ठेवण्यात आली आहे. यावर्षी 8 मार्चपासून शिमगोत्सवास सुरवात होणार आहे. तत्पूर्वी कार्निव्हलच्या किंगमोमोच्या राजवटीला 18 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे.

पर्यटन खात्याच्या वतीने कार्निव्हल आणि शिमगोत्सव आयोजनाविषयी काल पर्यटन भवनात बैठक पार पडली.

यावेळी पर्यटन विभाग, पोलिस खाते आणि अग्निशामक दलाचे अधिकारी उपस्थित होते. माहिती संचालक निखिल देसाई म्हणाले, की 18 फेब्रुवारीपासून राजधानी पणजीतून किंगमोमोच्या राजवटीस प्रारंभ होणार असून, ती राजवट चार प्रमुख शहरांत राहिल.

मिरवणुकांच्या तारखा नंतर जाहीर

अगोदर मध्यरात्रीपर्यंत शिमगोत्सवातील चित्ररथांची मिरवणूक चालत असल्याने चित्ररथ करणाऱ्यांची संख्याही अधिक असायची, परंतु वेळेचे बंधनामुळे चित्ररथ करणाऱ्या मंडळांची संख्याही कमी झाली आहे.

यंदाही शिमगोत्सवाची मिरवणुकीला 10 पर्यंतची वेळ आहे. राज्यातील 17 ठिकाणी शिमगोत्सवाच्या मिरवणुका निघणार असून यांच्या तारखा नंतर जाहीर होतील असे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT