Goa Shigmotsav 2023  Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotsav 2023: डिचोलीत आज शिगमोत्सव

'घणचे कटर घण'च्या निनादात शहर दुमदुमणार

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Shigmotsav 2023: डिचोलीत शुक्रवारी (ता. 10) शासकीय पातळीवरील शिगमोत्सव साजरा करण्यात येणार असून ''घणचे कटर घण''च्या निनादात डिचोली शहर दुमदूमून निघणार आहे.

शिगमोत्सवानिमित्त चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य आणि वेशभूषा स्पर्धा आयोजिल्या आहेत. शिगमोत्सव साजरा करण्यासाठी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन आणि विविध समित्या सज्ज झाल्या आहेत. दरम्यान, विविध स्पर्धांच्या बक्षीसांच्या रकमेत आता वाढ करण्यात आली आहे.

शुक्रवारी सायंकाळी 5 वा. श्री शांतादुर्गा विद्यालयाच्या प्रांगणात शिगमोत्सवाचे उद्‍घाटन होणार असून, प्रमुख पाहूणे म्हणून पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

याशिवाय मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, पालिकेचे मुख्याधिकारी सचिन देसाई, नगराध्यक्ष कुंदन फळारी आदी उपस्थित राहणार आहेत.

बोर्डेतून मिरवणुकीला प्रारंभ- बोर्डे वडाकडून श्री वडेश्वर देवाच्या प्रांगणातून शिगमोत्सव मिरवणूकीला प्रारंभ होणार असून भायली पेटमार्गे छत्रपती शिवाजी महाराज सर्कल आणि मैदानाकडून कदंब बसस्थानकावर आल्यानंतर मिरवणुकीची सांगता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dharbandora: 'हे आदिवासी संस्कृतीचा कणा असलेले जंगल, इथे IIT नको'! धारबांदोडा ग्रामस्थ ठाम; भूसंपादनास तीव्र आक्षेप

School Paperless Exams: पेपर विरहित परीक्षा घेणारे 'गोवा' ठरेल पहिले राज्य! हेगडेवार विद्यालयात यशस्वी प्रयोग

Damodar Saptah: जय जय रामकृष्ण हरी! दामोदर भजनी सप्ताह; 24 तास साखळी पद्धतीने भजनाची परंपरा

Goa Road Safety: '20 कोटी' दंड वसूल, मग अपघातप्रवण क्षेत्रे का सुधारली नाहीत? आलेमाव यांचा विधानसभेत सवाल

Goa Government Homes: दिलासा! गोव्यात बेघर लोकांना मिळणार हक्काचे घर; CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT