Adilshahi Palace Dainik Gomantak
गोवा

Adilshahi Palace: ‘फाजेंद’चा दरवाजा उद्या होणार बंद!

दैनिक गोमन्तक

Adilshahi Palace: येथील जुन्या सचिवालय इमारतीच्या मागे उभ्या असलेल्या लेखा संचालनालय इमारतीचा दरवाजा येत्‍या गुरुवारी (९ नोव्‍हेंबर) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास बंद होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्‍हणजे शुक्रवारपासून लेखा संचालनालय पर्वरीत कार्यरत होईल. ‘फाजेंद’ ( fazenda) इमारत म्हणून परिचित असलेल्या या इमारतीला मोठा इतिहास आहे.

सरकारने विकसित करण्यासाठी ही इमारत पाडली आणि तेथे खोदाई केली तर अनेक रहस्ये बाहेर येतील अशीही चर्चा आहे. इमारत पाहण्यासाठी सरकारने खुली केली तर त्यासाठीही मोठी गर्दी होईल.

पणजीतील लेखा संचालनालय शुक्रवारी पर्वरीत हलविण्यात येणार आहे. पोर्तुगीजपूर्व काळापासून उभी असलेल्‍या या इमारतीचा वापर आता सरकार कोणत्या कारणासाठी करते ते अजून स्पष्ट झालेले नाही. सरकारतर्फे नागरिकांवर लादण्यात येणारे अनेक प्रकारचे कर तथा शेतसारा आणि दस्त या सर्वांची सरकारी खजिन्यात भरणा करण्याची जागा म्हणजे जमादारखाना संचालनालय सेवा. १९१७ मध्ये पोर्तुगीजांनी Direccao dos servicos de fazenda या यंत्रणेची स्थापना केली असली तरी, त्यापूर्वीपासून ती अस्तित्वात असल्याचे पुरावे इतिहासात सापडतात.

पोर्तुगीजांच्या आक्रमणापूर्वी ही स्थानिक सरकारी संस्था होती. तिचे नाव थानादार किंवा थानादारी असे होते. ही संस्था त्या-त्या तालुक्यातील गावकरी, ग्रामसंस्थांकडून येणारे अनेक प्रकारचे कर, शेतसारा, जमीन भाडे स्वीकारत होती. १५१० मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यावर कब्जा केल्यानंतर त्यांनी या थानादारीचे काम पाहिले आणि अशा प्रकारची संस्था त्यांनी तशाच स्वरूपात सुरू ठेवली.

पोर्तुगीज आणि आदिलशहा यांच्या युद्धात त्यावेळी आदिलशहाचा एक सरदार, ज्याचे नाव थीमय्या किंवा तिमोज असे होते त्याने या युद्धात पोर्तुगीजांना सहकार्य केले. यामुळे आफोन्सो द आल्बुकर्क याने थिमय्या याला मोर दे थानेदार म्हणून या संस्थेच्या प्रमुखपदी नेमले. त्याने गावकरी, ग्रामसंस्थांकडून सरकारतर्फे कर गोळा करण्यास सुरूवात केली. यासाठी त्याला तारण म्हणून एक लाख क्रुझादोस ही पोर्तुगीज नाणी सरकारकडे तारण ठेवावी लागली होती. पोर्तुगीजांनी मल्हारराव नावाच्या एका हिंदू पुढाऱ्यालाही ठाणेदार दे मोर या पदावर नेमल्याची नोंद आहे.

पोर्तुगीजांनी नंतर १५१५ मध्ये fetor आणि त्यानंतर capito da cidade अशी कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांची पदे निर्माण केली. २९ डिसेंबर १८१२ रोजी Tribunal de contos असे या संस्थेचे नामकरण करण्यात आले. त्यानंतर या संस्थेला Reparticao de fazenda असे ओळखण्यात येऊ लागले. प्रत्येक तालुक्यात या संस्थेचे कार्यालय उघडण्यात आले. अखेर १९५१ मध्ये Direccao Dos services de fazenda e conta Dilidade असे नामकरण करण्यात आले.

यामुळे fazenda हे खाते सर्वोच्च खाते बनले. इतर खात्यांकडून त्यांच्या कराचा भरणा या खात्यात करण्यात येऊ लागला आणि त्यामुळे प्रशासनावर या खात्याचा प्रभाव दिसू लागला. या खात्याचे प्रमुख म्हणून secretario de fazenda या पदावर नेमणूक करण्यात येऊ लागले.

१९६३ मध्ये लोकनियुक्त सरकार स्थापन झाले आणि इतर राज्यांप्रमाणे या इमारतीत लेखा संचालनालय सुरू झाले.

गूढ भुयारे; एक उघडते थेट मांडवी नदीत

या इमारतीतून जुन्या सचिवालय इमारतीत जाण्यासाठी भुयार होते. शिवाय अन्य दोन भुयारे असून त्यापैकी एक थेट मांडवी नदीत उघडते असेही सांगितले जाते. या भुयारांतून सरपटणारे प्राणी सदर इमारतीत येत असत. इमारतीत कर्मचाऱ्यांचा वावर नसलेला मोठा भाग आहे. लेखा संचालनालयात आत शिरल्यावर तेथील काही जागेतच कर्मचारी बसत होते. त्यामागे हा गूढ भाग आहे. पहिल्या मजल्यावरून थेट भुयारी भागात उतरण्याची सोय आहे. उपाहरगृह आणि भांडार यांच्या बाजूने हा भाग असल्याचे सांगण्यात येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT