Mandrem News Dainik Gomantak
गोवा

Mandrem News : मांद्रे प्राथमिक शाळेसाठी सरपंचांनी उभारली शेड

Mandrem News : दरवर्षी १५ ऑगस्टला पावसात थांबून विद्यार्थी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात भाग घेत होते. तसेच विद्यार्थ्यांना पावसात रेनकोट व सायकली ठेवण्यासाठी जागा नव्हती. विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सरपंच प्रशांत नाईक यांनी ही शेड बांधून दिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mandrem News :

मोरजी, नाईकवाडा - मांद्रे येथील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पावसाळ्यात होणारी गैरसोय लक्षात घेऊन सरपंच प्रशांत ऊर्फ बाळा नाईक यांनी स्वखर्चाने शेड उभारून दिली आहे.

दरवर्षी १५ ऑगस्टला पावसात थांबून विद्यार्थी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात भाग घेत होते. तसेच विद्यार्थ्यांना पावसात रेनकोट व सायकली ठेवण्यासाठी जागा नव्हती. विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सरपंच प्रशांत नाईक यांनी ही शेड बांधून दिली आहे.

सरपंच प्रशांत नाईक यांनी शाळेला केलेल्या या मदतीबद्दल पालक शिक्षक संघाने त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी मुख्याध्यापिका चित्रा केरकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रसाद सावळ, उपाध्यक्ष तन्वी केरकर व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सरपंच प्रशांत नाईक यांनी सांगितले की, मी याच प्राथमिक शाळेत माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. या शाळेला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. मी माझ्या कर्तव्याच्या भावनेने शाळेला मदत केली आहे आणि यापुढेही माझ्या हातून शाळेला मदत करण्याची संधी मिळाल्यास मी ती नक्कीच करेन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT