पणजी: कारखाने आणि बाष्पक खात्याकडे नोंदणी करणाऱ्या रोजंदारीवरील कामगारांत गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. २०१५ मध्ये खात्याकडे अशा १,३०,७९१ कामगारांची नोंद होती. परंतु, गेल्या दहा वर्षांत त्यात ४०,२५५ कामगारांची घट झाली. त्यामुळे ३१ मार्च २०२५ पर्यंत हा आकडा ९०,५३६ इतका झाला.
नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन खात्याच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ३१ मार्च २०१५ पर्यंत कारखाने आणि बाष्पक खात्याकडे उत्तर गोव्यातील ७१,३६८ आणि दक्षिण गोव्यातील ५९,४२३ अशा मिळून रोजंदारीवर काम करणाऱ्या १,३०,७९१ कामगारांनी (Worker) नोंदणी केलेली होती. त्यानंतरच्या काळात खात्याकडे नोंदणी करणाऱ्या कामगारांच्या संख्येत प्रत्येक वर्षी घट झाली. ३१ मार्च २०२५ पर्यंत हा आकडा ९०,५३६ पर्यंत आल्याचे अहवालातील आकडेवारीतून दिसून येते.
कारखाने आणि बाष्पक खात्याकडे गेल्या दहा वर्षांच्या काळात आणखी १८ कारखान्यांची नोंदणी झाल्याचेही नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन खात्याच्या अहवालातून दिसून येते. २०१५ मध्ये खात्याकडे उत्तर गोव्यातील ४२३ आणि दक्षिण गोव्यातील (South Goa) ३०६ अशा एकूण ७२९ कारखान्यांची नोंदणी झाली होती. पण, ३१ मार्च २०२५ पर्यंत उत्तर गोव्यातील २४१ आणि दक्षिण गोव्यातील ५०६ कारखान्यांची खात्याकडे नोंद झाल्याचे अहवालात म्हटले आहे. यातून या दहा वर्षांत आणखी १८ कारखान्यांची भर पडल्याचे स्पष्ट होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.