Secretary General Zhang Ming And External Affairs Minister Dr. S. Jaishankar Dainik Gomantak
गोवा

SCO Summit 2023 : पाहुणे दाखल, ‘बी टू बी’ सुरू; सर्वांचे लक्ष भारत-पाकिस्तानच्या चालींवर

परिषदेमध्ये अनेक देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी होणार

दैनिक गोमन्तक डिजिटल

SCO Summit 2023 : गोव्यात बाणावली येथे आजपासून शांघाय सहकार्य संघटनेची परिषद सुरू होत आहे. या परिषदेत चीन, पाकिस्तान, रशियासह इतर सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री सामील होत असून या बहुतांश राष्ट्रांचे परराष्ट्रमंत्री आपल्या शिष्टमंडळासह राज्यात दाखल झाले आहेत.

या परिषदेमध्ये अनेक देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी होणार असले तरीही सर्वांचे लक्ष भारत-पाकिस्तानच्या चालींवर असणार आहे. परिषदेचा मुख्य दिवस उद्या शुक्रवारी असला तरी मुख्य बैठकीपूर्वीच्या बैठकांना सुरुवात झाली असून भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर आणि परिषदेचे सेक्रेटरी जनरल झिंग मिंग यांनी आज बैठकी घेतल्या.

प्रामुख्याने सुरक्षा आणि परस्पर सहकार्य हा या बैठकीचा मुख्य उद्देश असला तरी भारताकडून स्टार्टअप, पारंपरिक औषधे, युवाशक्तीकरण, बुद्ध वारसा, विज्ञान तंत्रज्ञान आदी मुद्यांवर चर्चा होईल, अशी माहिती डॉ. जयशंकर यांनी दिली आहे.

शांघाय को-ऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन ही युरेशियन राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात सक्रिय असलेली संस्था आहे.

दरम्यान, या परिषदेसाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय नेते राज्यात दाखल झाले आहेत. चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लावरोव गोव्यात दाखल झाले असून आज त्यांनी राजशिष्टाचाराच्या अंतर्गतत येणाऱ्या औपचारिकता पूर्ण करत बैठकांमध्ये भाग घेतला.

चीनकडून आंतरराष्ट्रीय मुद्यांना प्राधान्य

राज्य परिषद सदस्य आणि परराष्ट्रमंत्री किन गँग इतर एससीओ सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक परिस्थिती आणि विविध क्षेत्रांतील एससीओ सहकार्य, अशा विषयांवर चर्चा करतील, असे बीजिंगमधील चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

इराण, बेलारूसच्या सहभागाची शक्यता

चीन आणि रशियाच्या नेतृत्वाखालील युरेशियन सुरक्षा गटामध्ये कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या चार मध्य आशियाई राष्ट्रांचाही समावेश आहे, तर भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये या गटात सामील झाले आहेत. इराण आणि बेलारूस या देशांचा देखील यात समावेश होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

SCROLL FOR NEXT