Goa Beach Shacks Dainik Gomantak
गोवा

Goa Beach Shacks: ‘रात्री 11 नंतरही शॅक चालू ठेवण्यास परवानगी द्या...'; शॅकमालकांची पुन्हा सरकारकडे मागणी

North Goa Shack Owners: उत्तर गोव्यातील समुद्रकिनारी शॅक चालवणाऱ्या काही मालकांनी रात्री 11 वाजल्यानंतरही शॅक सुरु ठेवण्याची मागणी केली आहे.

Manish Jadhav

पणजी: उत्तर गोव्यातील समुद्रकिनारी शॅक चालवणाऱ्या काही मालकांनी रात्री 11 वाजल्यानंतरही शॅक सुरु ठेवण्याची मागणी केली आहे. रात्री उशिरा पर्यटक समुद्र किनाऱ्यावरील शॅकमध्ये येत असल्याने उशिरापर्यंत शॅक सुरु राहिल्यास व्यवसायाला चालना मिळू शकते, असा दावा काही शॅकमालकांनी केला आहे. मात्र, धोरणाचे पालन करुन व्यवसाय करणेही महत्त्वाचे असल्याचे देखील त्यांनी मान्य केले.

गोवा राज्य शॅक धोरण 2023-26 नुसार शॅक (Shacks) सकाळी 7 वाजता सुरु होऊन रात्री 11 वाजेपर्यंतच चालवण्याचा नियम आहे. शॅकमालकांना व्यवसायाच्या दृष्टीने अडचणी येत असल्या तरी कायद्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

कायदा सर्वांना समान

शॅकमालक कल्याण संघटनेचे सरचिटणीस जॉन लोबो म्हणाले की, ज्यांनी 1 वाजेपर्यंत मद्यविक्रीचा परवाना घेतला आहे, त्यांना नियमानुसार शॅक चालवण्याची परवानगी मिळायला हवी. मात्र, परवाना नसताना उशिरापर्यंत शॅक चालवणे योग्य नाही. कायदा सर्वांना समान.

...तर शॅक व्यावसायिकांविरुद्धही कारवाई

सध्या किनारपट्टीवरील शॅक तसेच हॉटेलमध्ये (Hotel) रात्री 10 वाजल्यानंतर संगीत बंद करण्याची तसेच मद्य विक्रीचा परवानाच्या वेळेनंतर विक्री झाल्यास कारवाई करण्यात येत आहे. रात्री उशिरा मद्य विक्री परवान्याचे उल्लंघन करुन होत असल्याने त्यावरच लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती पर्यटन पोलिस विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली. नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास शॅक व व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिलेल्या आहेत, त्यानुसार कार्यवाही होत असल्याचे त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT