vijai sardesai Dainik Gomantak
गोवा

SGPDA Market: "एसजीपीडीए मार्केटचा वापर फक्त हप्ता वसुलीसाठीच", कचरा गैरव्यवस्थापनावरून विजय सरदेसाईंनी भाजपला घेरलं

vijai sardesai: SGPDA मार्केटचा वापर केवळ हप्ता वसूल करण्यासाठी केला जात आहे, अशी टीकाही आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

Sameer Amunekar

सासष्टी: एसजीपीडीए मार्केटमधील कचरा गैरव्यवस्थापनाला भाजप जबाबदार आहे. तेथील कचरा तात्काळ उचलला नाही तर आपण खाजगी एजन्सी मार्फत तो उचलू. एसजीपीडीए मार्केटची दुर्दशा झाली असून या मार्केटचा वापर केवळ हप्ता वसूल करण्यासाठी केला जात आहे, अशी टीकाही आमदार विजय सरदेसाई यांनी केली.

‘एसजीपीडीए’ मार्केटमध्ये कचऱ्याचे ढिगारे झालेत व मडगाव पालिका तो कचरा हटवायला नकार देत आहे. मडगाव शहराच्या विकासासाठी आमदार कॉंग्रेसमधून भाजपात गेले. पण भाजपचेच नगराध्यक्ष ‘एसजीपीडीए’तील कचरा उचलू नका, असा आदेश देतात, याला काय म्हणावे, असा सवालही सरदेसाई यांनी केला.

एसजीपीडीएचे चेअरमन हे भाजपचे आमदार व प्रवक्ते आहेत, असे असताना गैर कारभारामुळे नागरिकांना मात्र नाहक त्रास सोसावे लागतात. भाजपच्या स्वच्छ भारत अभियान व मडगावमधील वास्तव यावर त्यांनी टीका केली.

मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी!

घाऊक मासळी मार्केट आता रस्त्यावरील विक्रेत्यांनी व्यापले आहे. व या विक्रेत्यांचे संरक्षण बाऊन्सरद्वारे केले जात आहे. त्यासाठी मडगावच्या आमदारांचा वरदहस्त असल्याची टीकाही सरदेसाई यांनी केली. मुख्यमंत्री हे कचरा व्यवस्थापन मंत्री आहेत व त्यांनी या ढासळलेल्या परिस्थितीची जबाबदारी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. मडगाव, फातोर्डा व सासष्टीतील नागरिकांनी या सर्व प्रकाराबद्दल असहकार पुकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

पालिकेने नकार दिलेला नाही!

पालिका अभियंता दीपक देसाई यांच्या म्हणण्यानुसार पालिकेने कचरा उचलण्यास नकार दिलेला नाही. पण पार्किंग जागेत जे कचऱ्याचे ढिगारे आहेत, तो कचरा एसजीपीडीए ने योग्य प्रकारे वर्गिकरण करून डब्यात ठेवणे आवश्यक आहे. एसजीपीडीएने मार्केटमध्ये योग्य साधन सुविधा उपलब्ध केलेली नाही. कचऱ्यासाठी तिथे कचरापेट्या ठेवण्यात आलेल्या नाहीत, असेही देसाई यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT