Goa Crime News | Sexual Assault on Minor at Bhoma Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: भोममध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; 19 वर्षीय तरुण म्हार्दोळ पोलिसांच्या ताब्यात

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे.

दैनिक गोमन्तक

Sexual Assault on Minor at Bhoma

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. भोम-मुस्लीमवाडा येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी सादिक रहेज खान (वय 19 वर्षे) याला अटक केली आहे. संशयित सादिक भोम येथील स्क्रॅप यार्डात काम करतो, अशी माहिती आहे.

पीडितेशी होते प्रेमसंबंध, मात्र..

सादिकचे भागातील 17 वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध होते. दोन दिवसांपूर्वी सादिकने मुलीला आपल्या खोलीत बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

यापूर्वीही एकदा सादिकने पीडितेवर बलात्कार केला होता; पण यावेळी त्या दोघांत भांडण झाल्याने पीडितेने आपल्या कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती दिली. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.

पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदवल्यानंतर म्हार्दोळ पोलिसांनी सादिक खानला ताब्यात घेतले आहे. याबाबत संशयिताची पुढील तपासणी सुरू आहे.

अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT