Sexual Assault Case Dainik Gomantak
गोवा

Sexual Assault Case: पहिल्या मजल्याचे CCTV फुटेज गायब; पीडितेचे वर्तनही संशयास्पद, तपासातील त्रुटींवर तरुण तेजपालच्या वकिलाचा जोरदार युक्तिवाद

Tarun Tejpal case: ‘तहलका’चा संपादक तरुण तेजपाल याच्या प्रकरणातील अंतिम सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी गोवा पोलिसांच्या तपासातील त्रुटींवर तेजपाल यांचे वकील आबाद पोंडा यांनी पुन्हा बोट ठेवले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला ‘तहलका’चा संपादक तरुण तेजपाल याच्या प्रकरणातील अंतिम सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी गोवा पोलिसांच्या तपासातील त्रुटींवर तेजपाल यांचे वकील आबाद पोंडा यांनी पुन्हा बोट ठेवले.

हॉटेलमधील पहिल्या मजल्याचे सीसीटीव्ही फुटेज संशयास्पदरित्या गायब झाल्याचा आरोप त्यांनी केला. कथित घटनेनंतर तक्रारदार महिला पत्रकाराचे वर्तन व पुराव्यांमध्ये असलेला विरोधाभास त्यांनी पुन्हा एकदा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.

तक्रारदार महिलेचा आरोप आहे की, तेजपाल यांनी लिफ्टचे दरवाजे बंद ठेवून ती सतत वर-खाली फिरवत ठेवली आणि जवळपास दोन मिनिटे तिला आत अडवून ठेवले. याउलट पोंडा यांनी दावा केला, की दोघेही चुकून दुसरा मजला समजून पहिल्या मजल्यावर उतरले होते व आपली चूक लक्षात आल्यावर काही सेकंदांतच पुन्हा लिफ्टमध्ये परतले.

ॲड. आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला की, हॉटेलच्या तळमजल्यावरील व दुसऱ्या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी गोळा केले. मात्र, पहिल्या मजल्याचे फुटेज न्यायालयात कधीच सादर केले नाही. खटल्याच्या सुनावणीदरम्यान स्वतः तपास अधिकाऱ्यांसह अनेक सरकारी साक्षीदारांनी हे मान्य केले होते. जर तपास यंत्रणेने ते फुटेज पाहिले होते, तर ते जतन का केले गेले नाही? पहिल्या मजल्याचे फुटेज कोर्टासमोर आले असते तर सत्य पुराव्यासह सिद्ध झाले असते. सत्र न्यायालयाने देखील आपल्या निकालात हे फुटेज सादर न करणे, हा पोलिसांचा मोठा दोष मानला होता.

पोंडा यांनी युक्तिवाद केला की, कथित घटनेनंतरही तक्रारदार महिलेने ‘थिंकफेस्ट’मधील सर्व कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता. इतकेच नव्हे, तर कथित घटनेनंतर तक्रारदार महिलेने स्वतः तरुण तेजपाल यांना आवाज देऊन, हॉलिवूड अभिनेते रॉबर्ट डी निरो यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी बोलावले होते.

ज्या डिव्हाईसमध्ये सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग होते, ते पोलिसांनी वेळेत जप्त केले नाही आणि त्याची ‘हॅश व्हॅल्यू’ जनरेट केली नाही. खटल्यादरम्यान जेव्हा मूळ डीव्हीआर तपासण्याची मागणी तेजपालने केली, तेव्हा सरकारी पक्षाने ‘तो डीव्हीआर आता बंद पडला आहे’ असे सांगून विरोध केला. या संपूर्ण पार्श्वभूमीवर सरकारी पक्षाला आपले आरोप वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे सिद्ध करता आले नाहीत आणि याच मुख्य कारणास्तव सत्र न्यायालयाने तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती, असा युक्तिवाद पोंडा यांनी केला.

‘तो’ माफीनामा तेजपालचा नव्हे!

सरकारी पक्षाने ज्या ‘माफीनाम्याचा ई-मेल’ मुख्य पुरावा म्हणून सादर केला आहे, तो मुळात तेजपाल यांनी लिहिलेला किंवा पाठवलेलाच नव्हता; तर तो तक्रारदार महिलेच्या सांगण्यावरून तयार करण्यात आला होता, असा प्रतियुक्तिवाद ॲड. पोंडा यांनी केला.

अंतिम सुनावणी शनिवारीही होणार

‘तहलका’चे माजी मुख्य संपादक तरुण तेजपाल यांच्या २०२१ मधील निर्दोष मुक्ततेविरोधात गोवा सरकारने दाखल केलेल्या अपिलावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर अंतिम सुनावणी शनिवारी देखील सुरू राहणार आहे. न्या. डॉ. नीला गोखले आणि न्या. अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Brett Lee On Vaibhav Sooryavanshi: 'तो खरंच 15 वर्षांचा असेल तर...' वैभव सूर्यवंशीच्या वयावरील वादावर 'ब्रेट ली'चं सडेतोड उत्तर Watch Video

UPI Transaction Charges: 'यूपीआय पेमेंट' विनामूल्यच! केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण; निवडक व्यवहारांवरच शुल्क आकारणी

Goa Cricket Team Oman Tour: गोव्याचा सीनियर क्रिकेट संघ ओमानमध्ये दाखल; दौऱ्यात दोन टी-20, तीन एकदिवसीय मिळून रंगणार एकूण 5 सामने

History: अरबी घोडे, पर्शियन व्यापारी अन् समुद्रमार्गे होणारा व्यापार; बहामनी साम्राज्याच्या काळात दाभोळ कसे बनले होते कोकणचे शक्तिशाली बंदर?

Goa Politics: सत्तेसाठी विरोधकांची मोट बांधणार कोण? काँग्रेसची यात्रा, 'आप'ची रणनीती अन् विजय सरदेसाईंची महत्त्वाकांक्षा

SCROLL FOR NEXT