Cape Market Dainik Gomantak
गोवा

Cape News: सांडपाण्याची डबकी, सोकपिट भरले, झाडेझुडपे वाढली; केपे बाजार दुर्गंधीमय

Cape Market: इमारती शेतजमिनीत उभारल्याने सांडपाण्याची डबकी तयार झाली आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात सध्या पावसाने जोर धरला असून पाणी साचून रोगराई पसरू नये म्हणून आरोग्य खात्यातर्फे लोकांना दक्षता घेण्यास सांगितले जात आहे; पण केपे बाजारात गेल्या कित्येक वर्षांपासून रहिवासी इमारतींचे घाणीचे पाणी उघड्यावर वाहून त्या पाण्याची डबकी तयार झाली आहेत. घाणीचे पाणी उघड्यावर वाहत असल्याने या भागात दुर्गंधी पसरली आहे.

केपे बाजारात अनेक रहिवासी इमारती उभ्या राहिल्या आहेत. साधारण सहा रहिवासी इमारती पूर्वी ज्या ठिकाणी लोक शेती करत होते त्या जागेत उभारल्या असल्याने या इमरतीत जे फ्लॅटधारक आहेत त्यांच्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी सोकपिट बांधण्यात आले आहेत ते भरून वाहू लागले आहेत.

या इमारती शेतजमिनीत उभारल्याने पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून काहींचे सोकपिट भरून रस्त्यावरून वाहत आहेत. त्यामुळे सांडपाण्याची डबकी तयार झाली आहेत.

केपे बाजारात या इमारतीमध्ये व्यवसाय करणाऱ्या व या बाजारात येणाऱ्या लोकांना नाक मुठीत धरून जावे लागते. याविषयी लोकांनी कित्येकवेळा संबंधित खात्याला सांगूनही कोणतीच उपाययोजना हाती न घेतल्याने वाहत जाणाऱ्या या घाणीच्या पाण्याची आता डबकी तयार झाली असून चोहोबाजूनी झाडेझुडपे वाढली आहेत.

या घाणीच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होऊन या भागात रोगराई पसरण्याची भीती लोकांनी व्यक्त केली आहे.

मलनिस्सारण प्रकल्प उभारावा

येथील रहिवासी इमारती शेतजमिनीत उभारल्या असल्याने ही समस्या पूर्णपणे निकालात काढण्यासाठी या इमारतीसाठी मलनिस्सारण प्रकल्प उभारणे हा एकमेव पर्याय आहे. यासाठी सरकारने या प्रकल्पाशेजारी असलेली पडिक जमीन संपादन करून त्याठिकाणी हा प्रकल्प उभारावा, अशी मागणी नगरसेवक प्रसाद फळदेसाई यांनी केली.

प्रसाद फळदेसाई, नगरसेवक, केपे

केपे येथे राज्य सरकारतर्फे जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या होत्या. त्यावेळी आपण त्यांच्याकडे केपेवासीयांना भेडसावणारी ही समस्या मांडली होती आणि मंत्र्यांनी संबंधित खात्याला याविषयी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते; पण आता त्याचे काय झाले, याची माहिती नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT