गोवा

Margao: मडगावात सांडपाण्यामुळे शेतजमीनीसह आरोग्याला धोका! शेतकरी चिंतेत; तातडीने उपाययोजना करण्याची केली मागणी

पावलो फर्नांडिस यांनी याबाबत सांगितले की, ही वेळ शेतात लागवड करण्याची आहे, पण शेतात सांडपाणी भरल्याने आम्हाला काहीही करता येत नाही.

Manish Jadhav

सासष्टी: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ जवळील सीवेज चेंबरमधून सांडपाणी गळती होऊन येथील शेतात वाहत आहे. जवळच रुग्णालय आणि प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट हायस्कूल असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या सीवेज चेंबरची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

दरम्यान, काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन याचा निषेध केला. पावलो फर्नांडिस यांनी याबाबत सांगितले की, ही वेळ शेतात लागवड करण्याची आहे, पण शेतात सांडपाणी भरल्याने आम्हाला काहीही करता येत नाही. आम्ही कित्येक वर्षांपासून येथे भात लागवड करीत आलो आहोत. मात्र यंदा लागवड करता येईल की नाही याचीच चिंता आहे असे त्यांनी सांगितले.

बेताळभाटीहून आपल्या मुलांना प्रेझेंटेशन हायस्कूलमध्ये पोहोचविण्यास येणाऱ्या पालकाने सांगितले की, या पाण्यातून जाण्यास भीती वाटत आहे. सांडपाण्याची गळती तत्काळ थांबली पाहिजे. नाही तर विद्यार्थ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे.

आमदार, मंत्र्याने लक्ष द्यावे

समाजसेविका फेडोल परेरा यांनी सांगितले की, सीवेज पाइपलाइनचे काम मे महिन्याअगोदर पूर्ण व्हायला पाहिजे होते. स्थानिक आमदार व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: साळगाव दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर

Goa Politics: सरकार गोवेकरांचे की दिल्लीकरांचे? आमदार वीरेश यांचा सवाल, 'सडेतोड नायक'मध्ये मांडली भूमिका

WCL 2025: टीम इंडिया 2025च्या WCL मधून बाहेर, पाकिस्तानची थेट 'फायनल'मध्ये एन्ट्री

Ro-Ro Ferry In Goa: गाजावाजा करत सुरू केलेली 'रो-रो फेरीबोट' सेवा 15 दिवसांतच ठप्प होण्याच्या मार्गावर, प्रवाशांना नाहक मन:स्ताप

Goa School: पाणी पिण्‍यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार चार मिनिटांचा 'ब्रेक', शिक्षण खात्‍याकडून परिपत्रक जारी

SCROLL FOR NEXT