
सासष्टी: फातोर्डा व मडगावमधील शेतजमिनी ताब्यात घेऊन त्या खासगी स्वरूपाच्या सार्वजनिक प्रकल्पांना देण्याचा सरकारचा घाट आहे. मडगावचा जो मास्टर प्लॅन तयार केला आहे त्यातून हे स्पष्ट होत आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला.
फातोर्डा फॉरवर्डच्या नगरसेवकांबरोबरच हल्लीच घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सरदेसाई यांनी सांगितले की, फातोर्ड्यातील शेतजमीन सरकारने पुष्कळ वर्षांपूर्वी विकत घेतली होती. मात्र, या जमिनीवर सरकारचा ताबा नाही.
या शेतजमिनीवर स्थानिक शेतकरी भात पिकवतात. त्यांना आपण खत व इतर सुविधा उपलब्ध करीत आहे; पण सध्या आखलेला मास्टर प्लॅन या शेतजमिनी खासगी प्रकल्पांसाठी वापरण्याचे हे कारस्थान आहे, असे वाटते. मास्टर प्लॅन हा लोकाभिमुख असण्याची गरज आहे. त्यामुळे या आराखड्याला आपला पूर्णपणे विरोध आहे.
या घडीला आम्ही मास्टर प्लॅनला मान्यता देऊ शकत नाही. २०२६ मध्ये नगरपालिका निवडणुका झाल्यानंतर लोकांच्या सूचना व त्यांच्या परवानगीने मास्टर प्लॅन तयार करणे आवश्यक असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.
कित्येक वर्षांपासून या शेतजमिनीवर गोवा राज्य नगर विकास मंडळ (जीसुडा) डोळा आहे. मात्र, शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत त्याचा प्रतिकार केला आहे. या शेतजमिनीवर इमारती बांधण्याचा कोणाचा तरी डाव आहे. या मास्टर प्लॅनमध्ये शहरी विकासाला गती देण्याचा उल्लेख आहे. इलेक्ट्रिक शटल सेवेद्वारे सार्वजनिक वाहतुकीवर भर देण्याचे कलम आहे. ही केवळ सूचना असून लोकांच्या डोळ्यांना पाणी पुसण्याचा हा प्रकार असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.