Goa Congress |  Dainik Gomantak
गोवा

पाण्याच्या टँकरमधून सांडपाण्याची वाहतूक, FDA संचालकांना नाही खबर; काँग्रेसचे गोमंतकीयांना सतर्क राहण्याचे आवाहन

सांकवाळ येथील पाण्याच्या टँकरमध्ये सांडपाणी वाहून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती.

Pramod Yadav

"सांकवाळ येथील पाण्याच्या टँकरमध्ये सांडपाणी वाहून नेल्याची घटना त्यांच्या विभागाला माहिती नसल्याचे एफडीएच्या संचालकांनी स्पष्टपणे कबूल केले हे धक्कादायक आहे.

यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार लोकांच्या जीवाशी खेळत असून गोव्यातील नागरिकांच्या जगण्याच्या हक्काचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत," असा आरोप अमित पाटकर यांनी केला.

काँग्रेसच्या इतर कार्यकर्त्यांसह एफडीएच्या संचालकांना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या टॅंकरमधून मलमूत्र नेले जात असल्याच्या घटनेचा संदर्भ देत निवेदन दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांच्यासोबत कॅप्टन विरिएटो फर्नांडिस, मॉरेनो रिबेलो, मनीषा उसगावकर, वीरेंद्र शिरोडकर, सावियो डिसिल्वा, विशाल वळवईकर, जॉन नाझारेथ, मुक्तमाला फोंडवेकर, नौशाद चौधरी, जोएल आंद्राद, मनोज पालकर, सुदीन नायक, राजेंद्र कोरगांवकर, पिटर डिसोजा, मोहन धोंड आणि इतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गोमंतकीयांना स्वच्छ, प्रदूषण विरहीत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची नसल्याचे सदर खात्याच्या संचालक ज्योती सरदेसाई यांनी स्पष्ट केल्याने आता गोमंतकीय नागरिकांनी सतर्क राहून त्यांना पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता स्वताच तपासण्याचे आवाहन काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केले आहे.

"आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला भेट दिली तेव्हा अभियंत्यांनी आम्हाला गोव्यात 80 एमएलडी पाण्याची कमतरता आहे आणि लोक टँकरने पाणी घेत आहेत अशी माहिती दिली. दुर्दैवाने, पाण्याचे टँकर दूषित पाणी पुरवतात आणि पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी एफडीएकडे कोणतीही यंत्रणा नाही," असे कॉंग्रेसचे माध्यम विभाग अध्यक्ष अमरनाथ पणजीकर म्हणाले.

आम्ही एफडीए संचालकांना पाण्याच्या टँकरमधून वाहून नेल्या जाणार्‍या सांडपाण्याचा घटनेची चौकशी करण्यासाठी तसेच व्यावसायिक आणि निवासी घरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी योग्य पाऊले उचलण्यासाठी एका आठवड्याचा अल्टिमेटम देऊन निवेदन दिले आहे.

एफडीएने कारवाई न केल्यास आम्ही मोठे आंदोलन करू. काँग्रेस पक्ष या विषयावर जलस्त्रोत खात्यालाही भेट देणार असल्याचे अमरनाथ पणजीकर यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT