Khadpaband  Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipal Election 2023: खडपाबांधमधील अनेक विकासकामे रखडली

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 6 हा खडपाबांधचा प्रमुख भाग म्हणून गणला जातो. सध्या या प्रभागात अनेक नवीन प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे येथे नवनवीन वसाहती विकसित व्हायला लागल्या आहेत.

बंगल्याबरोबर सदनिकांचे व आस्थापनांचे जाळेही पसरायला लागले आहे. हा प्रभाग प्रामुख्याने भाजपचा बालेकिल्ला म्हणून गणला जातो. गेल्या विधानसभा निवडणुकीत या प्रभागात भाजपला 190, काँग्रेसला 135 तर मगोला 130 मते प्राप्त झाली होती.

फोंड्यातील खडपाबांध येथे असलेले प्रख्यात शिवपार्वती मंदिर, उद्यान आणि राणे कन्स्ट्रक्शन ही या प्रभागाची प्रमुख आकर्षणे. शिवपार्वती मंदिराकडे जातानाचा रस्ता अतिशय अरुंद असल्यामुळे तसेच उतार असल्यामुळे वाहने चालवताना चालकांची त्रेधातिरपीट उडताना दिसते.

प्रभाग पाचप्रमाणेच या प्रभागालाही मलनिस्सारण तसेच गॅसवाहिनी प्रकल्पाच्या खड्ड्यांमुळे गालबोट लागल्यासारखे झाले आहे.

हॉटमिक्स केलेले रस्तेसुद्धा नव्याने खोदलेल्या खड्ड्यांमुळे निस्तेज पडल्यासारखे वाटत आहेत. या प्रभागात असलेले एकमेव उद्यान हे मात्र फोंड्यातील एक आघाडीचे उद्यान म्हणून ओळखले जाते.

लिविया आगियार उतरणार रिंगणात

विधानसभेत खडपाबांध हा प्रभाग जरी भाजपच्या बाजूने राहिला असला तरी येथील विद्यमान नगरसेवक मात्र काँग्रेसचा आहे. या प्रभागाचे नगरसेवक विलियम्‍स आगियार हे सध्या काँग्रेसचे गटाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

गेल्या खेपेला त्यांनी भाजपचे आशिष कुंकळकर यांचा सुमारे दीडशे मतांनी पराभव केला होता. यावेळी ते निवडणूक रिंगणात उतरणार नसून त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी लिविया आगियार या निवडणूक लढविणार आहेत.

या प्रभागाच्या विकासाबद्दल विचारल्यावर त्यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची यादीच वाचली. या प्रभागात एकूण 1147 मतदार आहेत. त्यात हिंदू तसेच बिगरगोमंतकीयांचा जास्त भरणा दिसून येतो.

नियोजनबद्ध विकासाची गरज

खडपाबांध प्रभागाचा फेरफटका मारल्यास काही ठिकाणी गटरांवर स्लॅब घातले नसल्याचे दिसून आले. दोन वीजखांब पडले असून गेल्या काही दिवसांत नागरिकांनी मागणी करूनसुद्धा हे खांबे बसविण्यात आले नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

काही भागात पाण्याची टंचाई असून एका दिवसाआड आणि तेही दोन तासांसाठी पाणी येत असल्याची माहितीही नागरिकांनी दिली.

एकंदरीत हा प्रभाग परिपक्व वाटत असला तरी प्रलंबित असलेला मलनि:स्सारण प्रकल्प, गॅसवहिनीचे काम, अरुंद रस्ते व इतर छोट्या-मोठ्या त्रुटी अधोरेखित होत आहेत. नियोजनबद्ध विकासाची हाक हा प्रभाग देत असल्याचे दिसून आले.

गेल्‍या पाच वर्षांत प्रभागाचा विकास साधण्‍याबरोबरच मतदारांशी संपर्कही वाढविला आहे. त्‍यामुळे आता आणि भविष्‍यातही मतदार माझ्‍यासोबतच असतील. यावेळी माझी पत्‍नी लिविया आगियार या निवडणूक लढविणार आहेत.

- विलियम्‍स आगियार, विद्यमान नगरसेवक (प्रभाग ६)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT