Pitbull Dog 
गोवा

Anjuna: आई घरकाम करत असलेल्या घरातील कुत्र्यानेच केला हल्ला, सात वर्षीय चिमुकल्याने गमावला जीव

Anjuna Goa: जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Pramod Yadav

Anjuna Goa

हणजूण येथे पिटबूल जातीच्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. आई घरकाम करत असलेल्या घरातील कुत्र्यानेच हल्ला केल्याने ही घटना घडली.

गंभीर जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी (२८ ऑगस्ट) सायंकाळी ही घटना घडली.

प्रभास कळंगुटकर (वय ०७) असे या हल्ल्यात मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रभास हणजूण येथे आई घरकाम करत असलेल्या कामाच्या ठिकाणी गेला होता. यावेळी घरातील पिटबुल जातीच्या कुत्र्याने मुलावर हल्ला केला.

या हल्ल्यात प्रभास गंभीर जखमी झाला. जखमी प्रभासला उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचा लाट पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT